अक्षय बडवे, पुणे|ता. २९ जानेवारी २०२४
शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यामध्ये ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे संजय राऊत यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत. या मुलाखतीच्या कार्यक्रमाआधी संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला, ज्यामध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षावर तसेच शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला.
काय म्हणाले संजय राऊत?
"देशात फक्त विरोधकांवरच राजकीय सुडबुद्धीतून कारवाई होते. अजित पवार (Ajit Pawar) यांचा ७० हजारचा घोटाळा, शिखर घोटाळा, प्रफुल्ल पटेल यांचे घोटाळे हे तर पंतप्रधान सांगतात. दादा भुसेंना नोटीस पाठवताना ईडीची शाई संपते का? असा खोचक सवाल करत आम्हाला टाका तुरुंगात, किती दिवस टाकणार आहात? फासावर लटकवायचं आहे तर लटकवा, आम्ही मागे हटणार नाही, तुम्ही डरपोक आहात.." असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
यावेळी बोलताना संजय राऊत यांनी राहुल नार्वेकरांच्या (Rahul Narvekar) पक्षांतर बंदी कायदा समितीवर झालेल्या नियुक्तीवरुन सडकून टीका केली. "हा तर सगळ्या मोठा फ्रॉड, १० पक्ष बदलेला काय महान माणूस आहे? असे म्हणत ही नियुक्ती म्हणजे संविधानाचा अपमान आहे, बाबासाहेब आंबेडकरांनंतर हाच माणूस सापडला का?" असा खोचक सवाल संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विचारला.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मुख्यमंत्र्यांकडून फसवणूक..
"मराठा आरक्षणावरुन (Maratha Reservation) मंत्री मंडळात मतभेद स्पष्ट दिसत आहेत. भुजबळ (Chhagan Bhujbal) वेगळी तर फडणवीस (Devendra Fadanvis) वेगळी भूमिका घेतात. यावर आम्हाला काही बोलायचं नाही. मुख्यमंत्री शुद्ध फसवणूक करतात. हे सगळं ठरवून चाललं आहे. तसेच राज ठाकरे यांचा आरक्षणाचा प्रश्न बरोबर आहे, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.