Manoj jarnage: मराठ्यांचा कोणताही तह झालेला नाही, आम्ही जिंकून आलोय; विरोधकांच्या टीकेला जरांगेंचं प्रत्युत्तर

Manoj jarnage News: मनोज जरांगे लढ्यात जिंकले, पण तहात हरले, अशी उपरोधिक टीका ओबीसी नेत्यांनी केली होती.
Manoj Jarange vs Chhagan Bhujbal Latest News
Manoj Jarange vs Chhagan Bhujbal Latest News Saam Tv
Published On

Manoj jarnage Latest News

मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी तब्बल ७ महिने लढा दिला. उपोषण, पदयात्रा, तसेच मोठा मोर्चा काढून त्यांनी राज्य सरकारला मराठा आरक्षणाची अधिसूचना काढायला लावली. अखेर सरकारने देखील जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य केल्या. मात्र, त्यानंतर ओबीसी नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली. . ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Manoj Jarange vs Chhagan Bhujbal Latest News
CAA Act News: येत्या ७ दिवसांत नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू होणार; केंद्रातील बड्या मंत्र्याचा दावा

मनोज जरांगे लढ्यात जिंकले, पण तहात हरले, अशी उपरोधिक टीका ओबीसी नेत्यांनी केली होती. या टीकेला मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. सगेसोयरे हा शब्द फायनल झाला आहे. नोंद सापडलेल्यांमुळे नोंद न सापडलेल्या मराठ्यांना याचा फायदा होणार आहे. त्यामुळे सोशल मीडियावर गप्पा ठोकण्यापेक्षा तज्ज्ञ लोकांनी सरकार दरबारी आपलं म्हणणं मांडावं, असा टोला जरांगेंनी हाणला.  (Latest Marathi News)

राज्य सरकारने मराठा आरक्षणाची अधिसूचना काढल्यानंतर आज (२९ जानेवारी) मनोज जरांगे पाटील रायगडाच्या दिशेने रवाना झाले. उद्या ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मातीचं दर्शन घेऊन तेथील माती कपाळावर लावणार आहेत. तत्पुर्वी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. तसेच मराठा बांधवांनी आता टेन्शन फ्री राहावं, असं आवाहनही जरांगेंनी केलं.

मराठ्यांचा कोणताही तह झालेला नाही. आम्ही जिंकून आलो आहेत. सगेसोयरे संदर्भातही कायदा झाला आहे. त्यामुळे मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाही तरी अडचण नाही. कोणीही टेन्शन घ्यायचं नाही. फक्त सर्व मराठ्यांनी एकजूट राहा. एकत्र या, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

छगन भुजबळांना मराठ्यांचं चांगलं झालेलं त्यांना पाहवत नाही. ओबीसींचाही फायदा झाला पाहिजे अशी आमची नियत आहे. परंतु, लोकांच्या अन्नात माती कालवण्याची नियत आमची नाही. त्यामुळे मराठ्यांनी टेन्शन घ्यायचं नाही. समाजाला कुठे काही अडचण आली तर मी आंदोलनासाठी तयार आहे, असा इशाराही जरांगे यांनी दिला आहे.

Manoj Jarange vs Chhagan Bhujbal Latest News
NCP MLA Disqualification: राष्ट्रवादीच्या सत्तासंघर्षात मोठी घडामोड; सुप्रीम कोर्टाने घेतला मोठा निर्णय!

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com