Smriti Mandhana Father Health Saam Tv
महाराष्ट्र

सकाळी नाश्ता करताना अस्वस्थ वाटलं, नंतर हृदयविकाराचा झटका; स्मृती मानधनाच्या वडिलांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट

Smriti Mandhana Wedding: स्मृती मानधनाच्या वडिलांना हार्ट अटॅक आला असून त्यांच्यावर सांगलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्मृतीच्या वडिलांची प्रकृती बिघडल्यामुळे तिचे लग्न पुढे ढकलण्यात आले.

Priya More

Summary -

  • स्मृती मानधनाच्या वडिलांना हार्ट अटॅक

  • स्मृतीच्या वडिलांना माईल्ड हार्ट अटॅकची लक्षणे

  • नाश्ता करताना अस्वस्थता वाटू लागल्यानंतर रुग्णालयात दाखल

  • वडिलांची तब्येत बिघडल्यामुळे लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय

भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार आणि सांगलीची सुकन्या असलेल्या स्मृती मानधनाचा विवाहसोहळा तुर्तास रद्द करण्यात आला आहे. स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना उपचारासाठी सांगलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली उपचार सुरू आहेत.

संपूर्ण देशाचं लक्ष स्मृतीच्या लग्न सोहळ्याकडे लागून राहिलं होतं. गेल्या ३ दिवसांपासून या लग्न सोहळ्याच्या निमित्ताने भारतीय महिला क्रिकेट संघ देखील स्मृतीच्या सोबत होता. वेगवेगळे इव्हेंट्स या लग्न सोहळ्याच्या निमित्ताने पार पडत होते. आज सायंकाळी मुख्य लग्न सोहळा पार पडणार होता. साडेचार वाजताचा लग्नाचा मुहूर्त होता. याचदरम्यान दुपारच्या सुमारास स्मृती मानधनाच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला आणि एकच गोंधळ उडाला. त्यामुळे लग्नसोहळा रद्द करण्यात आला.

सांगलीच्या सर्वहित रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या रुग्णालयाचे डॉ. नमन शहा यांनी सांगितले की, 'स्मृती मानधना यांच्या वडिलांना दुपारी दीड वाजताच्या सुमारास डाव्या बाजू्च्या छातीत दुखत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात आणण्यात आले. त्यांना माइल्ड हार्ट अटॅक आल्याची लक्षणे आहेत. त्यांच्या चाचण्या सुरू आहेत. त्याचा बीपी वाढला असून हृदयाचे ठोके देखील वाढले आहेत. त्यांना अंडर ऑब्झर्वेशनमध्ये ठेवण्याची गरज आहे. सध्याची स्थिती स्थिर आहे. पण स्टेबल होण्यासाठी एक ते दोन दिवस लागतील.'

तसंच, 'त्यांच्या रक्ताच्या तपासण्यामध्ये कार्डियक एंजेम्स थोडे वाढलेले असल्यामुळे त्यांना सतत इसीजी मॉनिटरिंग करून गरज पडली तर एन्जिओग्राफी करावी लागेल. सगळ्याच प्रकारची तयारी आम्ही करून ठेवलेली आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून आपण एक दिवस- रात्र ऑब्झर्वेशनमध्ये ठेवून पुढचा निर्णय कुटुंबीयांशी बोलून घेऊया. घरचे सगळे इकडेच आहेत. आमची संपूर्ण टीम त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तयार आहे. लग्न हा कार्यक्रम मानसिक आणि शारिरीक पद्धतीने स्ट्रेसफुल असतो. त्यांना पूर्वीचे काही आजार नव्हते. पण अशावेळी थोडं इमोशन आणि मानसिक ताण-तणावामुळे हार्टअटॅक येऊ शकतो. कुठल्याही व्यक्तीला येऊ शकतो. त्यांचे आरोग्य चांगले आहे. पण छातीत तीव्र प्रकारे दुखत असल्यामुळे माइल्ड हार्ट अटॅकचे लक्षणं आहेत आणि त्याच्यावर उपचार सुरू आहेत.'

तर स्मृतीच्या मॅनेजमेंट टीममधील तुहिन मिश्रा यांनी सांगितले की, 'स्मृती मानधनाचे वडील श्रीनिवास मानधना आज सकाळी नाश्ता करत होते तेव्हा त्यांना अस्वस्थ वाटत होते. त्यांची तब्येत खराब झाली. आम्हाला वाटले थोड्या वेळात त्यांना बरे वाटेल पण त्यांची प्रकृती आणखी बिघडत चालली होती. त्यामुळे आम्ही रिस्क नको घ्यायला म्हणून रुग्णवाहिका बोलावली आणि त्यांना रुग्णालयात नेलं. त्यांच्यावर डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली उपचार सुरू आहेत. स्मृतीचा वडिलांवर खूप जीव आहे. त्यामुळे स्मृतीने निर्णय घेतला की जोपर्यंत वडिलांची प्रकृती ठिक होत नाही तोपर्यंत लग्न पुढे ढकलण्यात यावे. आम्ही सर्वजण धक्क्यात आहोत. ते लवकरात लवकर बरे व्हावेत अशी आमची सर्वांची इच्छा आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SSC Exam : पुण्यातच दहावीचे २ पेपर फुटले, टेलिग्रामवरच्या अॅडमिनवर गुन्हा

Maharashtra Live News Update : सिलिंडरचा काळाबाजर रोखण्यासाठी सरकारकडून उपाययोजना

Dahi Misal Pav Recipe : स्ट्रीट स्टाइल दही मिसळ घरी कशी बनवाल? फॉलो करा 'ही' स्टेप बाय स्टेप रेसिपी

'तू फ्रिजमध्ये सापडशील...' बॉयफ्रेंडच्या त्रासाला कंटाळून डेंटिस्ट तरुणीची आत्महत्या; ६ पानांच्या सुसाईड नोटने मुंबई हादरली

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना ₹३००० मिळणार? फेब्रुवारी-मार्चचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT