अनंत गर्जे यांच्या पत्नीने आयुष्य संपवल्याचं समोर आलेय.
ही आत्महत्या नसून हत्या, असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला.
मृतदेहाचा पोस्टमार्टम अहवाल या प्रकरणातील निर्णायक पुरावा ठरणार आहे.
मुलीचे कुटुंब वरळी पोलीस ठाण्यात दाखल होऊन न्यायाची मागणी करत आहे.
Why family is alleging murder in the death of Anant Garje’s wife : राजकीय वर्तुळातून पुन्हा एकदा धक्कादायक बातमी समोर आली आहे. पंकजा मुंडे यांचे PA अनंत गर्जे यांच्या (Pankaja Munde’s Personal Assistant) पत्नीचा मृत्यू झाला आहे. अवघ्या काही महिन्यापूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. पण लग्नानंतर काही दिवसातच अनंत गर्जे यांच्या पत्नीने स्वतःचे आयुष्याचा दोर कापल्याची धक्कादायक माहिती समोर आला आहे. मुलीची आत्महत्या नसून हत्या असल्याचा गंभीर आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. मुलीचं कुटुंब थेट वरळी पोलिस ठाण्यात दाखल झालं असून गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे. मुलीच्या कुटुंबियांच्या गंभीर आरोपांमुळे या घटनेला राजकीय रंग चढण्याची शक्यता निर्माण झाली
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री अनंत गर्जे यांच्या पत्नीने आयुष्याचा दोर कापला. या प्रकरणी पोलिसांकडून प्राथमिक चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांनी अनंत गर्जे यांच्या पत्नीचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. त्यानंतरच हत्या आहे की आत्महत्या, याबाबत स्पष्ट होईल. अनंत गर्जे यांचे काही महिन्यापूर्वीच थाटात लग्न झाले होते. त्यांच्या पत्नीने आत्महत्या का केली? यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
मुलीच्या कुटुंबियांकडून अनंत गर्जे यांच्यावर मुलीची हत्या केल्याचा गंभीर आरोप केला आहे. मुंबईतील वरळी येथील पोलीस स्टेशनमध्ये कुटुंबियांकडून तक्रार दाखल केली आहे. संपूर्ण कुटुंबाकडून न्यायाची मागणी केली जात आहे. पोलिसांकडून या प्रकऱणाचा कसून तपास केला जात आहे. पोलिसांच्या चौकशीनंतरच या आरोपात तथ्य किती आहे? हे स्पष्ट होणार आहे. पोलिसांकडून अनंत गर्जे यांच्या शेजारील लोकांचे जबाब नोंदवले जात आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.