Satara News: शेळीला वाचवताना भयंकर घडलं, विजेचा धक्का लागून आजी अन् नातवाचा तडफडून मृत्यू

Grandmother and Grandson Die of Electric Shock: साताऱ्यामध्ये विजेचा धक्का लागून आजी आणि नातवाचा दुर्दैवी मृत्यू झाला. शेळीला वाचवण्याच्या प्रयत्नात ही धक्कादायक घटना घडली.
Satara News: शेळीला वाचवताना भयंकर घडलं,  विजेचा धक्का लागून आजी अन् नातवाचा तडफडून मृत्यू
Satara NewsSaam Tv
Published On
  • साताऱ्यात शेळी वाचवताना दोघांचा मृत्यू

  • आजी-नातवाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला

  • शेळीला आधी विजेचा धक्का लागला होता

  • शेळीला नातू आणि नंतर नातूला आजी वाचवत असताना तिघांचा मृत्यू

ओंकार कदम, सातारा

साताऱ्यामध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. शेळीला वाचवायला गेलेल्या नातवाला विजेचा धक्का लागला. हे पाहून त्या दोघांना वाचवण्यासाठी गेल्लया आजीला देखील विजेचा धक्का लागला. या घटनेमध्ये तिघांचा देखील तडफडून दुर्दैवी मृत्यू झाला. साताऱ्यातील माण तालुक्यातील मार्डी गावात ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मार्डी गावात तुटून पडलेल्या वीजवाहक तारेमुळे ही हृदयद्रावक घटना घडली. बेंद शिवारात शेळ्या चारत असताना एका शेळीचा पाय जिवंत विजेच्या तारेत अडकला. त्यामुळे ही शेळी तडफडू लागली. तिला वाचवण्यासाठी १३ वर्षांचा सुजित पुढे गेला असता त्यालाही विजेचा जोरदार धक्का बसला. विजेचा धक्का लागल्याने सुजित तडफडत होता.

Satara News: शेळीला वाचवताना भयंकर घडलं,  विजेचा धक्का लागून आजी अन् नातवाचा तडफडून मृत्यू
Satara : वाहतूक निरीक्षक शाहरूख खानला उद्धटपणा भोवला; एसटी महामंडळाची मोठी कारवाई

आपल्या डोळ्यांसमोर नातवाला मृत्यूशी झुंज देताना पाहून ६० वर्षीय आजी मालन काळे यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र विजेचा तीव्र प्रवाह असल्याने शेळीसह आजी-नातवाचा जागीच मृत्यू झाला. महावितरणच्या कथित निष्काळजीपणामुळे घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात तीव्र संताप आणि शोककळा पसरली आहे. एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाल्यामुळे काळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला.

Satara News: शेळीला वाचवताना भयंकर घडलं,  विजेचा धक्का लागून आजी अन् नातवाचा तडफडून मृत्यू
Satara: उरी सेक्टरमध्ये साताऱ्याच्या सुपुत्राला वीरमरण, ग्रेनेडच्या स्फोटात २ जवान शहीद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com