Gold and silver prices soar in India as government imposes restrictions on silver imports, triggering market uncertainty. saam tv
महाराष्ट्र

सोन्या-चांदीचे भाव गगनाला; केंद्र सरकारच्या एका निर्णयामुळे बाजारावर मोठा परिणाम, कारण काय?

Silver Import Restrictions India Price Impact 2026: केंद्र सरकारने चांदीच्या आयातीवर निर्बंध लावल्यानंतर सराफा बाजारात खळबळ उडाली आहे. जळगावसह देशभरात सोन्या-चांदीचे दर उच्चांकावर पोहोचले असून भविष्यात चांदी महागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Omkar Sonawane

संजय महाजन, साम टीव्ही

जळगाव: देशातील सोन्या चांदीची प्रमुख बाजारपेठ असलेल्या जळगावसह संपूर्ण देशातील सराफा बाजारासाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने चांदीच्या आयातीबाबत एक मोठा आणि धोरणात्मक निर्णय घेतला आहे. चांदीच्या आयात शुल्कात वाढ केल्यानंतर आता सरकारने चांदीची आयात मुक्त श्रेणीतून थेट मर्यादित श्रेणीत टाकली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आगामी काळात भारतीय सराफा बाजारात आणि चांदीवर आधारित उद्योगांमध्ये मोठे फेरबदल पाहायला मिळू शकतात.

निर्णयाचा सराफा बाजारावर काय परिणाम होणार?

केंद्र सरकारने चांदीच्या आयातीवर निर्बंध लादल्यामुळे आता देशात होणारी चांदीची आवक मर्यादित होणार आहे. आयात मर्यादित झाल्यामुळे बाजारात चांदीचा तुटवडा निर्माण होऊ शकतो, असा अंदाज जाणकरांनी व्यक्त केला आहे. परिणामी आगामी काळात चांदीच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता जळगावच्या नामांकित सराफा व्यवसायिकांनी वर्तवली आहे.

जळगाव बाजारात सोन्या-चांदीचे आजचे दर काय?

जळगावच्या सुवर्णनगरीत सध्या सोन्या-चांदीच्या किमतींनी उच्चांक गाठला आहे. बाजारातील ताज्या घडामोडींनुसार:

सोने: जीएसटीसह (GST) तब्बल १ लाख ६३ हजार रुपये प्रति तोळा (१० ग्रॅम).

चांदी:२ लाख ७५ हजार रुपये प्रति किलोवर जाऊन पोहोचली आहे.

सध्या बाजारपेठेत काय स्थिती आहे?

केंद्र सरकारने चांदीच्या आयातीबाबत एवढा मोठा निर्णय घेतला असला, तरी जळगावच्या स्थानिक बाजारपेठेत आज चांदीच्या किमतींवर याचा तातडीने कोणताही परिणाम झालेला नाही. आज बाजारात भाव पूर्णपणे स्थिर आहेत. मात्र, हा निर्णय दीर्घकालीन असल्याने भविष्यात चांदीच्या पुरवठ्यावर जसा परिणाम होईल, तसे भाव वाढतील असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

थोडक्यात समजून घ्या, काय आहे हा निर्णय?

१. आयात शुल्क वाढ: सरकारने आधी चांदीवरील आयात शुल्कात वाढ केली होती.

२. श्रेणी बदलली: आता चांदीची आयात 'मुक्त' नसल्याने, कोणतीही कंपनी किंवा व्यापारी थेट चांदी आयात करू शकणार नाही, त्यासाठी सरकारचे विशेष नियम आणि परवानग्या लागतील.

३. उद्योगांवर परिणाम: चांदीचा वापर दागिन्यांसह इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर होतो, त्यामुळे या क्षेत्रांवरही याचा प्रभाव पडेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sindhudurg: भयंकर! स्विमिंग पूलमध्ये उंचावरून उडी मारली, तरुणाचा जागीच मृत्यू

Masala Dosa Recipe: सकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी झटपट बनवा हॉटेल स्टाईल मसाला डोसा; वाचा रेसिपी

Maharashtra News Live Update: उद्धव ठाकरे यांचे परभणीत आगमन

Manchurian Recipe: घरच्या घरी बनवा हॉटेल स्टाईल टेस्टी व्हेज मंच्यूरियन; वाचा सोपी रेसिपी

Maharashtra Politics: उल्हासनगरमध्ये शिंदेसेनेला दुसरा मोठा धक्का, आणखी एका नगरसेविकेचे पद गेलं

SCROLL FOR NEXT