

सिंधुदुर्गच्या मालवणमध्ये स्विमिंग पूल अपघातात तरुणाचा मृत्यू
मृत तरुण कोल्हापूर जिल्ह्यातील कागलचा रहिवासी होता
छोट्या पूलमध्ये उंचावरून उडी मारल्याने तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली
पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला
स्विमिंग पूलमध्ये उंचावरून उडी मारणं तरुणाच्या जीवावर बेतलं. डोकं जमिनीवर आदळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मालवणच्या वायरी येथे ही भयंकर घटना घडली. तरुणाच्या आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. स्विमिंग पूलमध्ये जात असताना तरुणांनी काळजी घ्यावी असे आवाहन केले जात आहे.
छोट्या स्विमिंग पूलमध्ये उंचावरून उडी मारणं एका पर्यटकाच्या जीवावर बेतल्याची दुर्घटना मालवण वायरी येथील एका रिसॉर्टमध्ये घडली. श्रेणीक मिलींद टाकळे असं या मृत तरुणाचे नाव होते. श्रेणीक मुळचा कोल्हापूरच्या कागल येथे राहणारा होता. तो मित्रांसोबत कोकणात फिरण्यासाठी आला होता. मित्रांच्या डोळ्यासमोरच श्रेणीकने प्राण सोडले.
स्विमींग पूलमध्ये उंचावरून उडी मारल्याने श्रेणीकच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच मालवण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. कागल येथील १० मित्रांच्या ग्रुपसोबत श्रेणीक मालवण येथे फिरण्यासाठी आला होता.
यावेळी श्रेणीकचे काही मित्र स्विमिंगचा आनंद घेत होते. लहान मुलांसाठीच्या छोट्या स्विमिंग पूलमध्ये चार फुटाच्या भागामध्ये श्रेणीकने आठ ते दहा फुटावरून उडी घेतली. स्विमिंग पुलची उंची कमी असल्याने श्रेणीकचे डोकं स्विमिंग पुलच्या तळाशी जाऊन आदळले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या श्रेणीकचा जागीच मृत्यू झाला. सहकारी मित्रांनी तात्काळ त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.