Shreya Maskar
निवती समुद्रकिनारा हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पारूळे गावात वसलेला पांढरा शुभ्र वाळूचा एक शांत समुद्रकिनारा आहे. तुम्हाला येथे उन्हाळ्यात थंडगार वातावरण अनुभवता येईल.
निवती समुद्रकिनारा आपल्या स्वच्छ पाण्यामुळे, डॉल्फिन पाहण्यासाठी आणि लगतच्या ऐतिहासिक किल्ल्यासाठी ओळखला जातो. तुम्ही येथे वन डे फॅमिली ट्रिप प्लान करू शकता.
गोवा किंवा जवळच्या तारकर्ली येथील गजबजलेल्या समुद्रकिनाऱ्यांच्या तुलनेत निवती बीच खूप शांत आणि स्वच्छ आहे. हे ठिकाण खूप कमी लोकांना माहितेय. त्यामुळे येथे तुम्हाला जास्त गर्दी मिळणार आहे.
तुम्ही येथे निसर्गाच्या सानिध्यात बोटिंगचा आनंद घेऊ शकता. तुम्हाला सकाळी येथे खुल्या समुद्रात डॉल्फिन पाहायला मिळतील. तुम्ही त्यांचे सौंदर्य कॅमेरात कैद करू शकता.
निवती किल्ला हा महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात, निवती बीच लगतच्या एका उंच खडकाळ डोंगरावर वसलेला आहे. तुम्हाला येथे गेल्यावर इतिहासाची उजळणी होईल. किल्ल्याच्या माथ्यावरून संपूर्ण किनारपट्टीचे विहंगम दृश्य दिसते.
निवती समुद्रकिनाऱ्यावर तुम्ही जलक्रीडांचा आनंद घेऊ शकता. उदा. स्कूबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग, बोटिंग , बनाना राइड आणि स्पीड बोट
निवती बीचवर गेल्यावर तुम्हाला खडकांच्या अनोख्या रचना पाहायला मिळतील. सोन्यासारख्या चमकणाऱ्या वाळूच्या पट्ट्यासोबतच समुद्रात आणि किनाऱ्यावर वेगवेगळ्या आकारांचे, नैसर्गिकरीत्या तयार झालेले खडक पाहायला मिळतात.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.