Dapoli Tourism : समुद्राच्या लाटांसोबत शांततेचा आनंद, दापोलीतील 'हे' ५ समुद्रकिनारे विकेंडसाठी परफेक्ट डेस्टिनेशन

Shreya Maskar

दापोली

महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली हे एक निसर्गरम्य किनारपट्टीचे शहर असून ते उन्हाळ्याच्या सुट्टीत मजा-मस्ती करण्यासाठी बेस्ट लोकेशन आहे. तुम्ही येथे सुंदर समुद्रकिनाऱ्यांना नक्की भेट द्या.

Dapoli | google

लाडघर बीच

लाडघर बीच त्याच्या लालसर वाळूमुळे ओळखला जातो. लाडघर बीचला 'तामस तीर्थ' म्हणूनही ओळखले जाते. हा समुद्रकिनारा पॅरासेलिंग, जेट स्कीइंग, डॉल्फिन पाहण्यासाठी, बोटींगसाठी प्रसिद्ध आहे.

Ladghar Beach | google

कार्दे बीच

दापोलीपासून १२ किमी अंतरावर करदे बीच वसलेला आहे. कार्दे बीचचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे डॉल्फिन सफारी होय. जिथे तुम्ही सकाळी बोटीतून फेरफटका मारू शकता आणि पाण्यात उड्या मारणाऱ्या डॉल्फिनना पाहू शकता.

Karde Beach | google

मुरुड बीच

दापोली जवळील मुरुड बीच येथे वॉटर स्पोर्ट्स, एटीव्ही राईड्स आणि पाण्याजवळ घोडेस्वारीचा आनंद घेता येतो. ओहोटीच्या वेळी तुम्ही तुमची गाडी थेट वाळूवर चालवू शकता. येथे सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.

Murud Beach | google

अंजर्ले बीच

अंजर्ले बीच स्वच्छ, निर्मळ पाण्यामुळे आणि जवळच्या कासवांच्या घरट्यांसाठी प्रसिद्ध आहे. जर तुम्ही मार्च ते मे दरम्यान भेट दिली, तर तुम्हाला कासवांच्या पिल्लांच्या जन्माचा हंगाम अनुभवता येईल.

Anjarle Beach | google

केळशी बीच

नारळ आणि सुपारीच्या हिरव्यागार बागांमध्ये वसलेला केळशी बीच कोकणातील सुंदर पिकनिक स्पॉट आहे. तुम्ही येथे जोडीदारासोबत निवांत वेळ घालवू शकता.

Kelshi Beach | google

ऐतिहासिक ठिकाण

दापोली येथील सर्वात प्रसिद्ध किल्ला म्हणजे सुवर्णदुर्ग. हा १६ व्या शतकातील एक भव्य जलदुर्ग असून, तो अरबी समुद्रातील एका बेटावर वसलेला आहे.

Suvarnadurg | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

disclaimer | google

NEXT : घनदाट जंगलाच्या कुशीत वसलाय किल्ला, साताऱ्याला गेल्यावर 'हे' ऐतिहासिक ठिकाण नक्की फिरा

Satara | saam tv
येथे क्लिक करा...