Satara : घनदाट जंगलाच्या कुशीत वसलाय किल्ला, साताऱ्याला गेल्यावर 'हे' ऐतिहासिक ठिकाण नक्की फिरा

Shreya Maskar

सातारा

सातारा हे मराठा साम्राज्याची ऐतिहासिक राजधानी, पश्चिम घाटातील नयनरम्य निसर्गदृश्ये आणि कृषी-वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध आहे. शहराला हे नाव शहराला वेढणाऱ्या 'सात ताऱ्यां'वरून (सात टेकड्यांवरून) मिळाले आहे

Satara | google

वासोटा किल्ला

सातारा येथे वासोटा किल्ला वसलेला आहे. ज्याला 'व्याघ्रगड' असेही म्हणतात. तुम्ही येथे वीकेंडला ट्रेकिंगचा प्लान देखील करू शकता.

Vasota Fort | google

कोयना वन्यजीव अभयारण्य

वासोटा किल्ला कोयना वन्यजीव अभयारण्याच्या आत आहे. पूर्णपणे घनदाट जंगलाने वेढलेला आहे. वासोटा किल्ला तीनही बाजूंनी शिवसागर जलाशयाच्या (कोयना बॅकवॉटरच्या) पाण्याने वेढलेला आहे.

Koyna Wildlife Sanctuary | google

कसं जाल?

बामणोली गावातून बोटीने प्रवास करून पुढे ट्रेकिंगने तुम्ही वासोटा किल्ल्यावर पोहचाल. वासोटा किल्ल्याच्या माथ्यावरून दिसणारी सह्याद्री पर्वतरांगेची नेत्रदीपक दृश्ये सुखद अनुभव देतात.

trek | pinterest

छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६० मध्ये वासोटा किल्ला जिंकल्यानंतर त्याचे नाव बदलून 'व्याघ्रगड' असे ठेवले होते. किल्ल्याभोवतीचे घनदाट जंगल आणि त्याच्या नैसर्गिक सुरक्षिततेमुळे महाराजांनी त्याला हे नाव दिले.

Chhatrapati Shivaji Maharaj | pinterest

बाबू कडा

वासोटा किल्ल्याचे सर्वात मोठे मुख्य आकर्षण म्हणजे 'बाबू कडा' आहे. हा एक अत्यंत सरळ आणि U आकाराचा खोल कडा आहे. या कड्यावरून सह्याद्रीचे अथांग रूप आणि खाली निळ्याशार कोयना बॅकवॉटरचे (शिवसागर तलाव) विहंगम दृश्य दिसते.

Babu Kada | google

नागेश्वर गुहा

वासोटा किल्ल्याच्या (व्याघ्रगड) समोरील बाजूस आणि मुख्य शिखराच्या पोटाशी ही अद्भुत नागेश्वर गुहा वसलेली आहे. वासोटा आणि नागेश्वर यांच्या दरम्यान एक खोल दरी असून, वासोट्यावरून नागेश्वरचा भव्य सुळका स्पष्ट दिसतो.या नैसर्गिक गुहेमध्ये महादेवाचे प्राचीन मंदिर/शिवलिंग आहे.

Nageshwar Caves | google

ऐतिहासिक ठिकाणे

साताऱ्यात अनेक ऐतिहासिक ठिकाण आहेत. उदा. अजिंक्यतारा किल्ला, प्रतापगड किल्ला, सज्जनगड किल्ला, संगम माहुली

Pratapgad Fort | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

disclaimer | google

NEXT : हापूस आंब्यांच्या भूमीतील किल्ला, मराठ्यांच्या शौर्याची आठवण करून देते 'हे' ऐतिहासिक ठिकाण

Fort In Sindhudurg | Saam TV
येथे क्लिक करा...