Fort In Sindhudurg : हापूस आंब्यांच्या भूमीतील किल्ला, मराठ्यांच्या शौर्याची आठवण करून देते 'हे' ऐतिहासिक ठिकाण

Shreya Maskar

सिंधुदुर्ग

देवगड किल्ला हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १७ व्या शतकातील एक ऐतिहासिक सागरी किल्ला आहे. तुम्ही येथे सुट्ट्यांमध्ये ट्रिप प्लान करा.

Sindhudurg | google

देवगड किल्ला कोणी बांधला?

देवगड किल्ला १७२९ मध्ये मराठा सरदार दत्ताजीराव आंग्रे यांनी बांधला. तथापि, काहींच्या मते या किल्ल्याची गोमुखी प्रवेशद्वार रचना छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाशी मिळतेजुळती असल्याने हा किल्ला शिवकालीन असावा.

Who Built Devgad Fort? | google

देवगड किल्ला

देवगड खाडी आणि अरबी समुद्र यांच्या संगमावर एका उंच टेकडीवर वसलेला आहे. येथून सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. संध्याकाळचे येथील सौंदर्य खूप भारी आहे. पाण्यावर मावळणाऱ्या सूर्याचे गूढ आणि चित्तथरारक दृश्य पाहण्यासाठी येथे नक्की जा.

Devgad Fort | google

प्रमुख आकर्षण

देवगड किल्ल्याच्या प्रमुख आकर्षणामध्ये १९१५ मध्ये बांधलेले दीपगृह, ऐतिहासिक मंदिरे, भव्य तोफा यांचा समावेश आहे. येथील ऐतिहासिक बुरज , जुन्या तोफा पाहायला नक्की जा.

Key Attractions | google

देवगड किल्ला तटबंदी

देवगड किल्ल्याला तीन बाजूंनी समुद्रकिनारा आहे. चौथ्या बाजूला, मुख्य भूभागाकडे कठीण कातळात खोल खंदक खोदण्यात आला आहे. खंदकाच्या एका बाजूवरच दगडी तटबंदी उभारल्यामुळे तटबंदीची एकूण उंची प्रभावीपणे वाढवली गेली आहे.

Devgad Fort's Fortifications | google

देवगड किल्ल्यावर मंदिर

देवगड किल्ल्यावर श्री हनुमान मंदिर (मारुती मंदिर) आहे. येथे तुम्हाला शांत आणि प्रसन्न वातावरण अनुभवता येईल.

Temples | google

सिंधुदुर्गतील पिकनिक स्पॉट

सिंधुदुर्ग येथे अनेक पिकनिक स्पॉट आहेत. उदा. सिंधुदुर्ग किल्ला, तारकर्ली समुद्रकिनारा, देवगड समुद्रकिनारा, आंबोली धबधबा

Picnic Spots in Sindhudurg | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

disclaimer | google

NEXT : कोकणातील स्वर्ग! उन्हाळी सुट्टी संपण्याआधी 'हे' हिल स्टेशन नक्की फिरा

Konkan Tourism | saam tv
येथे क्लिक करा...