Konkan Tourism : कोकणातील स्वर्ग! उन्हाळी सुट्टी संपण्याआधी 'हे' हिल स्टेशन नक्की फिरा

Shreya Maskar

कोकण - रत्नागिरी

माचाळ हे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात वसलेले थंड हवेचे ठिकाण आहे. ज्याला 'कोकणचे मिनी महाबळेश्वर' म्हणून ओळखले जाते.

Konkan – Ratnagiri | google

सह्याद्रीच्या पर्वतरांग

सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये सुमारे ३,००० ते ४,००० फूट उंचीवर वसलेल्या माचाळ या ठिकाणी घनदाट हिरवळ, आल्हाददायक हवामान आणि हंगामी धबधबे पाहायला मिळतात. तुम्हाला उन्हाळ्यातही येथे थंड वातावरण अनुभवता येईल.

The Sahyadri Mountain Range | google

थंड हवामान

धुक्याने आच्छादलेले सह्याद्रीचे निसर्गदृश्य आणि घनदाट हिरवळ यामुळे माचाळचे सौंदर्य वाढते. तुम्ही येथे निसर्गाच्या सानिध्यात फोटोशूटचा आनंद घेऊ शकता.

Cool Climate | google

नयनरम्य पठारे

माचाळ हिल स्टेशनच्या उंचावरील सपाट प्रदेशात गेल्यावर आजूबाजूच्या निसर्गाचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. तुम्ही येथे ट्रेकिंग, हायकिंगचा आनंद घेऊ शकता.

Picturesque Plateaus | google

पर्यटन स्थळे

माचाळ हिल स्टेशन जवळ मार्लेश्वर मंदिर आणि धबधबा, आंबा घाट, गणपतीपुळे, आरे-वारे बीच, जयगड किल्ला अशी अनेक पर्यटन स्थळे आहेत.

Tourist Attractions | google

कसं जालं?

माचाळ हिल स्टेशनच्या जवळ रत्नागिरी आणि लांजा ही रेल्वे स्टेशन आहे. स्टेशनला उतरून तुम्ही रिक्षाने माचाळ हिल स्टेशनला पोहचाल.

How to Get There? | google

कोकणातील हिल स्टेशन्स

कोकणात अनेक हिल स्टेशन आहेत. यात आंबोली (सिंधुदुर्ग), दापोली (रत्नागिरी) , सूर्यमाळ (ठाणे) आणि खंडाळा यांचा समावेश आहे.

Hill Stations in Konkan | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध ना

disclaimer | google

NEXT : राजांचा गड 'रायगड', छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी पूर्वी 'या' नावाने ओळखली जायची

Raigad Fort | SAAM TV
येथे क्लिक करा...