Raigad Fort : राजांचा गड 'रायगड', छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी पूर्वी 'या' नावाने ओळखली जायची

Shreya Maskar

रायगड किल्ला

रायगड किल्ला महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला संरक्षण, मराठा सार्वभौमत्व आणि स्वराज्यनिष्ठा यांचा सर्वोच्च आदर्श म्हणून ओळखला जातो. रायगड किल्ला महाड शहराच्या नजीक वसलेला आहे. मुंबईच्या दक्षिणेस सुमारे १३६ किमी आणि पुण्यापासून १३८ किमी अंतरावर स्थित आहे.

Raigad Fort | google

रायगडचे जुने नाव काय?

महाराष्ट्रातील एक अभेद्य गिरीदुर्ग असलेला 'रायगड किल्ला' हा मूळतः 'रायरी' या नावाने ओळखला जात असे. 'रायगड' या शब्दाचा अर्थ 'राजाचा किल्ला' असा होतो.

Raigad Fort | google

युरोपियन लोक

युरोपियन लोक रायगड किल्ल्याला 'पूर्वेकडील जिब्राल्टर' असे म्हणत. हा किल्ला शिवरायांच्या काळातील सर्वात महत्त्वाचे ऐतिहासिक ठिकाण आहे.

Europeans | google

छत्रपती शिवाजी महाराज

इ.स. १६५६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ला चंद्रराव मोरे यांच्याकडून जिंकून घेतला. किल्ल्याची डागडुजी आणि पुनर्बांधणी केली आणि त्याचे नाव बदलून 'रायगड' असे ठेवले.

Chhatrapati Shivaji Maharaj | google

मराठा साम्राज्याची राजधानी

छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७४ मध्ये आपला राज्याभिषेक करून घेतला आणि रायगड किल्ल्याला मराठा साम्राज्याची राजधानी घोषित केले.

Capital of the Maratha Empire | google

प्रारंभिक इतिहास

रायगड किल्ला स्थानिक सरदारांचे मुख्य ठाणे होता. निजामशाहीच्या राजवटीत सुरुवातीला रायगड किल्ल्याचा वापर तुरुंग म्हणून केला जात असे.

Early History | google

मराठा साम्राज्य

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी रायगडच्या पुनर्बांधणी आणि तटबंदीचे काम मुख्य वास्तुविशारद आणि अभियंता सरदार हिरोजी इंदुलकर यांच्याकडे सोपवले होते.

The Maratha Empire | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

disclaimer | google

NEXT : शिवनेरी किल्ल्याचे 'हे' जुने नाव तुम्हाला माहीत आहे का?

Shivneri Fort | saam tv
येथे क्लिक करा...