Shivneri Fort : शिवनेरी किल्ल्याचे 'हे' जुने नाव तुम्हाला माहीत आहे का?

Shreya Maskar

पुणे

पुण्यात अनेक ऐतिहासिक ठिकाणे आहेत. यात शिवनेरी किल्ला, शनिवार वाडा, आगा खान पॅलेस, सिंहगड किल्ला, पाताळेश्वर गुंफा मंदिर आणि लाल महाल यांचा समावेश आहे.

Pune Tourism | saam tv

छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला, महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळ वसलेला आहे. हा किल्ला पुण्यापासून साधारणपणे ९०–९५ किमी आणि मुंबईपासून १५० किमी अंतरावर आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj | pinterest

शिवनेरी किल्ल्याचे जुने नाव काय?

शिवनेरी किल्ला पूर्वी 'जुन्नर किल्ला'(किंवा जुन्नरचा किल्ला) म्हणून ओळखला जायचा. हा किल्ला प्राचीन काळापासून जुन्नर शहराजवळ असल्याने या नावाने ओळखला जात असे.

old name of Shivneri Fort | google

शिवनेरी नाव कसं पडलं?

पहिले कारण असे की, शिवनेरी किल्ल्यावर 'शिवाई' नावाच्या देवीचे मंदिर आहे. या देवीच्या नावावरूनच या किल्ल्याला 'शिवनेरी' हे नाव पडले, असे बोले जाते.

Shivneri | pinterest

कारण

दुसरे कारण असे की, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला आणि त्यांच्या आई, जिजाबाई यांनी शिवाई देवीला आपल्या पुत्राला बलवान बनवण्यासाठी प्रार्थना केली होती, असे म्हटले जाते.

Reason | google

ट्रेक

शिवनेरी किल्ल्यावर तुम्ही छोटा ट्रेक करून जाऊ शकता. शिवनेरी किल्ल्याला सात प्रवेशद्वार आहेत.

trekking | google

कसं जाल?

मुंबईहून शिवनेरीला जाण्यासाठी तुम्ही पुणे रेल्वे स्टेशनला उतरा. तेथून पुढे रिक्षा किंवा बसने शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी पोहचाल.

How to get there? | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

disclaimer | google

NEXT : दाट जंगल, विशाल पठार अन् सह्याद्रीचे विहंगम दृश्य, शिवकालीन वैभव जपतोय आसनगावमधील 'हा' किल्ला

Fort In Asangaon | saam tv
येथे क्लिक करा...