Shreya Maskar
माहुली किल्ला महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यात, शहापूर तालुक्यात आसनगावाजवळ स्थित आहे. मुंबईपासून सुमारे ९४ किमी अंतरावर असलेला हा किल्ला सह्याद्रीच्या पर्वतरांगेत असून, तो ठाणे जिल्ह्यातील सर्वोच्च (समुद्रसपाटीपासून २,८१५ फूट) गड म्हणून ओळखला जातो.
माहुली किल्ला ट्रेकिंग आणि रॉक क्लाइंबिंगसाठी प्रसिद्ध आहे. येथे तुम्ही उन्हाळ्यात वीकेंडला मित्रांसोबत वन डे ट्रिपचा प्लान करू शकता.
माहुली किल्ला उंच शिखर आणि घनदाट जंगलाने वेढलेला आहे. माहुली किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी महाराजांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.
माहुली किल्ला हा १५ व्या शतकात मुघलांनी बांधला होता. हा किल्ला शिवाजी महाराजांच्या काळात मराठा साम्राज्याचा एक महत्त्वाचा भाग बनला.
माहुली किल्ल्यावर कॅम्पिंगचा आनंद घेता येतो. तसेच पक्षी निरीक्षणासाठी हे ठिकाण खूपच सुंदर आहे. वाटेत खाण्या-पिण्याची थोडी सुविधा देखील आहे.
शहापूर जवळील माहुली टेकड्यांच्या पायथ्याशी श्री भुवनभानू जैन मानस मंदिर वसलेले आहे. येथे तुम्हाला शांत वातावरण अनुभवता येते.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.