Shreya Maskar
महाराष्ट्राच्या मराठवाडा विभागात वसलेले जालना शहर, येथील असंख्य 'स्टील री-रोलिंग मिल्स'मुळे या विभागाची 'स्टील सिटी' (पोलाद नगरी) म्हणून प्रसिद्ध आहे.
रोहिलागड किल्ला हा महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात रोहिलागड गावात आहे. उन्हाळी सुट्टीत येथे नक्की फिरायला जा.
रोहिलागड किल्ला ९०० वर्षे जुना असून मध्यम दर्जाचा डोंगरी किल्ला आहे. प्राचीन औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)-देवगिरी व्यापारी मार्गाजवळ टेहळणी चौकी म्हणून याचा अनेकदा वापर केला जात होता.
रोहिलागड किल्ला छत्रपती संभाजीनगरपासून सुमारे ४० किमी, जालनापासून सुमारे ३५ किमी अंतरावर आहे. औरंगाबाद-बीड महामार्गापासून (रोहिलागड जंक्शन) सुमारे ७ किमी अंतरावर आहे.
रोहिलागड किल्ला त्याच्या प्राचीन खडकात कोरलेल्या गुहा, मध्ययुगीन तटबंदीसाठी प्रसिद्ध आहे. या किल्ल्यावर सातवाहन काळातील किंवा त्याही आधीची लेणी आणि इतर पुरातन अवशेष आढळून येतात. रोहिलागड किल्ल्यावर डोंगराच्या मध्यभागी तीन प्राचीन खडकात कोरलेल्या लेण्या सातवाहन काळातील असून, त्यात हिंदू धार्मिक शिल्पे आहेत.
यादव राजवंशाच्या काळात बांधलेला रोहिलागड किल्ला ट्रेकिंगसाठी उत्तम ठिकाण आहे. तुम्ही येथे निसर्गाच्या सानिध्यात ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता.
जालना येथे ४०० वर्षे जुनी 'काली मशीद', टेकडीवरील 'मत्स्योदरी देवी मंदिर', शांत व सुंदर 'मोती बाग' आणि 'आनंदी स्वामी मंदिर' यांसारख्या ऐतिहासिक , धार्मिक ठिकाणे आहेत.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.