Shreya Maskar
अलिबागजवळील कोलाबा किल्ला (कुलाबा किल्ला) हा भरती-ओहोटीच्या लाटांवर उभा आहे. हा जलदुर्ग पाहायला उन्हाळी सुट्टीमध्ये नक्की जा. येथे तुम्हाला वीकेंडला तुफान मजा-मस्ती करता येईल.
कोलाबा किल्ला हा ३०० वर्षे जुना सागरी किल्ला असून, महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यामध्ये, अलिबाग किनाऱ्यापासून साधारणपणे १ ते २ किलोमीटर अंतरावर अरबी समुद्रात वसलेला आहे.
अलिबागच्या समुद्रकिनाऱ्याजवळ असलेला ऐतिहासिक कोलाबा किल्ला हा मराठा आरमाराचे एक प्रमुख आणि मोक्याचे केंद्र होता. इतिहासातील हे एक सर्वात महत्त्वाचे ठिकाण आहे.
ओहोटीच्या वेळी पाण्यातून मार्ग मोकळा होऊन चालत किंवा घोडागाडीने किल्ल्यावर जाता येते, तर भरतीच्या वेळी किल्ल्याच्या चारी बाजूंनी पाणी वेढले जाऊन तो बेट बनतो आणि बोटीने जावे लागते.
कोलाबा किल्ला समुद्राच्या मध्यभागी असूनही, या किल्ल्याच्या आवारात गोड्या पाण्याची विहीर आहे. किल्ल्याची तटबंदी सुमारे २५ फूट उंच असून, त्यावर प्रवेशद्वाराजवळ वाघ, हत्ती, मोर यांच्या कोरीव आकृती आहेत.
कोलाबा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला होता. हा किल्ला १६५२ च्या सुमारास सागरी संरक्षणासाठी बांधण्यास सुरुवात झाली आणि पुढे त्याचे बळकटीकरण सरखेल कान्होजी आंग्रे यांनी केले.
कोलाबा किल्ल्याच्या आत गणपतीचे मंदिर, गोड्या पाण्याची विहीर, मराठाकालीन तोफा आहेत. येथे मराठ्यांनी इतिहास घडवला आहे.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.