काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची प्रकृती खालावली, तातडीने रुग्णालयात दाखल; पक्षातील नेते भेटीसाठी हॉस्पिटलमध्ये उपस्थित

V Hanumantha Rao Latest Health Update 2026: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व्ही. हनुमंत राव यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. किडनीच्या समस्येमुळे उपचार सुरू असून पुढील 48 तास महत्त्वाचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
Senior Congress leader V. Hanumantha Rao admitted to hospital as doctors monitor his kidney condition closely.
Senior Congress leader V. Hanumantha Rao admitted to hospital as doctors monitor his kidney condition closely.saam tv
Published On

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वी. हनुमंत राव यांना शनिवारी खैराताबाद येथील एशियन इन्स्टिट्यूट ऑफ नेफ्रोलॅाजी अँड युरोलॉजी मध्ये दाखल करण्यात आले. किडनीशी संबंधित जुन्या आजारामुळे त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने डॉक्टरांनी तात्काळ अत्याधुनिक उपचार सुरू केले आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ही पहिलीच वेळ नाहीये की वी हनुमंत राव यांना अशा गंभीर समस्येला सामोरे जावे लागत आहे. याआधीही किडनीच्या आजारामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि किडनी तज्ञ यांच्या देखरेखीखाली उपचार घेतल्यानंतर ते पूर्णपणे बरे झाले होते. रुग्णलयात दाखल होताच त्यांच्या वरिष्ठ डॉक्टरांची टीम त्यांची तपासणी करत आहे.

Senior Congress leader V. Hanumantha Rao admitted to hospital as doctors monitor his kidney condition closely.
भाजपच्या दिग्गज नेत्याची गळफास घेऊन आत्महत्या; घटनास्थळी सापडली सुसाइड नोट, चिठ्ठीतून धक्कादायक कारण समोर

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व्ही. हनुमंत राव यांच्यावर उपचार करणारे वरिष्ठ सल्लागार नेफ्रोलॉजिस्ट डॉ. राजेश नायर यांनी रुग्णालयाबाहेर त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, रुग्णालयात आणल्यावेळी त्यांच्या किडनीचे कार्य व्यवस्थित होत नव्हते. मात्र प्राथमिक उपचारांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. किडनीचे कार्य सुधारण्यासाठी त्यांना आयव्ही फ्लुइड्स आणि आवश्यक औषधे दिली जात आहेत. पुढील 48 तास त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे.

Senior Congress leader V. Hanumantha Rao admitted to hospital as doctors monitor his kidney condition closely.
Husband-wife death : गावाजवळच्या विहिरीत आढळले पती-पत्नीचे मृतदेह; महिनाभरापूर्वीच झालं होतं लग्न, अख्खं गाव हळहळलं

व्ही. हनुमंत राव रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी समजताच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून त्यांच्या समर्थकांमध्ये आणि पक्षातील सहकाऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. मंगळवारी सकाळी विविध राजकीय पक्षांचे अनेक वरिष्ठ नेते त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com