तस्करांचा माल सोडण्यास नकार; DRIच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला थेट 'दाऊद गँग'च्या नावाने धमकी, मोठी खळबळ

DRI Officer Threat Case In Pune By Smuggler: पुण्यात डीआरआयच्या उपसंचालकांना डी-कंपनीच्या नावाने धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. जप्त केलेले लॅपटॉप आणि मोबाईल सोडवण्यास नकार दिल्यानंतर तस्करांकडून धमक्या देण्यात आल्या असून या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
DRI Deputy Director receives threats allegedly linked to a smuggling network using D-Company’s name in Pune.
DRI Deputy Director receives threats allegedly linked to a smuggling network using D-Company’s name in Pune.saam tv
Published On

पुणे: तस्करी प्रकरणात कारवाई केल्यानंतर डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स (DRI) च्या उपसंचालकांना 'डी कंपनी' च्या नावाने धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

DRI Deputy Director receives threats allegedly linked to a smuggling network using D-Company’s name in Pune.
Viral Video : कडेवर बाळ घेऊन महिला धावत्या ट्रेनमधून उतरली, तोल गेला अन्...काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे २०२४ पासून पुण्यात 'डीआरआय'चे उपसंचालक म्हणून कार्यरत आहेत. यावर्षी मे महिन्यात ते आपल्या मूळ गावी सुट्टीवर असताना त्यांना आरोपी मुश्ताक शेखने फोन करून "मी तुमचा बातमीदार मेहमूद याला ओळखतो, मला तुमच्यासाठी इन्फॉर्मर म्हणून काम करायचंय," असे सांगून विश्वास संपादन करण्याचा त्याने प्रयत्न केला.

DRI Deputy Director receives threats allegedly linked to a smuggling network using D-Company’s name in Pune.
Mumbai Delisle Road Bridge News | अखेर केसरकर करणार डिलाई रोड पुलाचे उद्घाटन | saam tv

यानंतर त्याने पुन्हा त्यांना फोन करत, "माझे लोक दुबईवरून भारतात येत असताना मुंबई विमानतळावर एअर इंटेलिजन्स युनिट आणि कस्टम विभागाने आमचे लॅपटॉप आणि मोबाईल पकडले आहेत. आमचा हा तस्करीचा माल सोडून द्या, अशी धमकी दिली. माल सोडवण्यास नकार दिल्याने आरोपी मुश्ताकने फिर्यादी यांना व्हॉट्सॲपवर धमक्यांच्या ऑडिओ क्लिप पाठवायला सुरुवात केली. "तुमच्यामुळे माझ्या लोकांवर कारवाई झाली आहे. मी गेल्या ३० वर्षांपासून सोन्याची आणि इलेक्ट्रॉनिक्सची तस्करी करतोय, मला आजपर्यंत कोणीही थांबवू शकलेले नाही. माझे मोठ्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांशी संबंध आहेत, आता तुम्ही आणि तुमचे कुटुंब पुण्यातून बाहेर जिवंत कशी पडते तेच मी बघतो," असे तो म्हणाला.

DRI Deputy Director receives threats allegedly linked to a smuggling network using D-Company’s name in Pune.
'पाणी द्या, अन्यथा...'; डोंबिवलीकरांचा पाणीटंचाईवरून संताप, महिलांचा पालिकेवर हंडा-कळशी मोर्चा

काही दिवसात अनोळखी व्यक्तीने त्यांना फोन करून, "मी गेल्या ३० वर्षांपासून दाऊद इब्राहिम आणि डी-कंपनी सिंडिकेटसाठी काम करतो. मी महाराष्ट्र ए टी एस साठी देखील एक परिचित आणि रेकॉर्डवरील चेहरा आहे, अशी धमकी दिली. या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com