भाजपच्या दिग्गज नेत्याची गळफास घेऊन आत्महत्या; घटनास्थळी सापडली सुसाइड नोट, चिठ्ठीतून धक्कादायक कारण समोर

Political Leader Suicide Linked To Emotional Distress In Relationship: बेगम बाग येथे भाजपच्या युवा नेत्याने प्रेमसंबंधातील तणावामुळे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुसाईड नोट मिळाल्यानंतर पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
Police investigate the residence of BJP leader Ajay Sharma after his tragic suicide, with a note citing emotional distress from a relationship.
Police investigate the residence of BJP leader Ajay Sharma after his tragic suicide, with a note citing emotional distress from a relationship.saam tv
Published On

अलिगढ: बेगम बाग परिसरात भारतीय जनता पार्टीच्या विष्णुपुरी मंडळाचे उपाध्यक्ष अजय शर्मा (27) यांनी आपल्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना समजताच कुटुंबात एकच आक्रोश पसरला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला असून तो पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. तपासादरम्यान पोलिसांना घटनास्थळावरून एक सुसाईड नोट देखील मिळाली आहे. या पत्रात प्रेमसंबंधामध्ये आलेल्या निराशामुळे आत्महत्या केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. क्षेत्राधिकारी सर्वम सिंह यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे दिसत आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या सुसाईड नोटची सत्यता पडताळून पाहिली जात असून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.

Police investigate the residence of BJP leader Ajay Sharma after his tragic suicide, with a note citing emotional distress from a relationship.
Husband-wife death : गावाजवळच्या विहिरीत आढळले पती-पत्नीचे मृतदेह; महिनाभरापूर्वीच झालं होतं लग्न, अख्खं गाव हळहळलं

शवविच्छेदन अहवाल आणि तपासाच्या निष्कर्षांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. बेगम बाग येथील रहिवासी असलेले अजय शर्मा हे कुटुंबातील एकुलते एक मुलगे होते. त्यांना दोन बहिणी आहेत. त्यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून नातेवाईकांचा आक्रोश सुरू आहे. संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

Police investigate the residence of BJP leader Ajay Sharma after his tragic suicide, with a note citing emotional distress from a relationship.
Pune Crime: पुणे हादरले! नवऱ्याकडून बायकोची हत्या, झोपेत असताना डोक्यात सिलिंडर टाकला

पोलिसांच्या माहितीनुसार, सुसाईड नोटमध्ये एका तरुणीसोबतच्या प्रेमसंबंधांचा आणि त्यातून निर्माण झालेल्या मानसिक तणावाचा उल्लेख आहे. मात्र, प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून तपास पूर्ण झाल्यानंतरच माहिती समोर येईल. दरम्यान ही घटना समजताच भाजपमध्ये शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com