17 कोटींची चांदी घेऊन जाणारी व्हॅन पलटी; मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खळबळ|VIDEO

Silver Van Accident In Palghar Today: पालघरमध्ये मुंबई-अहमदाबाद महामार्गावर 17 कोटींची चांदी घेऊन जाणारी व्हॅन उलटली. 600 किलो चांदी सुरक्षित असून काही काळ वाहतूक विस्कळीत झाली.

पालघर येथे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर एक मोठा अपघात झाला. चांदीच्या विटांनी भरलेली एक व्हॅन उड्डाणपुलावर उलटली. या अपघातामुळे काहीवेळ मोठी खळबळ उडाली होती. या व्हॅनमध्ये अंदाजे 600 किलोची चांदी होती, ज्याची किंमत अंदाजे 17 कोटी इतकी आहे. ही घटना पालघर जिल्ह्यातील चारोती उड्डाणपुलावर घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून गुजरातकडे जाणारी व्हॅन उड्डाणपुलावर उलटली. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी थांबवण्यात आली होती. स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. व्हॅनमधला चांदीचा माल एका व्यापाऱ्याचा होता. ही चांदी मुंबईतील नकोडा बुलियन कंपनीकडून गुजरातच्या वापी जीआयडीसीमधील एका कंपनीकडे नेली जात होती. आतमध्ये सुरक्षितपणे पॅक केलेली चांदी, व्हॅन उलटल्यानंतरही सुरक्षित राहिली. मात्र, चांदीचे प्रमाण जास्त असल्यामुळे घटनास्थळी सुरक्षा वाढवण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com