१७ वर्ष रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गावर सरकारी टोळक्यांची टोल वसूली

Toll Collection On Incomplete Mumbai Goa Highway Controversy: गेल्या दिड दशकापासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडलेले आहे. सरकारसाठी ही मोठी लाजीरवाणी गोष्ट आहे. मात्र या महामार्गाबाबत आणखी एक संतापजनक प्रकार समोर आलाय़. हा महामार्ग अपूर्ण असतानाही टोल वसुली सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पाहूया एक रिपोर्ट...
Toll collection begins on the incomplete Mumbai-Goa Highway, triggering anger among commuters over poor road conditions.
Toll collection begins on the incomplete Mumbai-Goa Highway, triggering anger among commuters over poor road conditions.saam tv
Published On

मुंबई-गोवा महामार्गाचं कित्येक वर्षं रखडलेलं काम आणि त्याची दुर्दशा हा राज्यात चेष्टेचा आणि सरकारसाठी नामुष्कीची गोष्ट आहे.दोन राज्यांना जोडणाऱ्या या महामार्गाचं काम गेल्या 17 वर्षांपासून रखडलेलं असतानाच प्रशासनानं टोलवसुली करण्यात मात्र तत्परता दाखवली आहे. रायगड जिल्ह्यातील नागोठणे, कोलाड इथला उड्डाणपूल तसेच सुकेळी खिंड, माणगाव-इंदापूर बायपास आणि सर्व्हिस रोडची कामे अजूनही अर्धवट असताना खारपाडात थेट टोलवसुली सूरू झालीय

गोवा हायवे अपूर्ण, टोल वसुली सुरू

वाहन प्रकार

कार/जीप/व्हॅन -

एकेरी प्रवास 95

परतीचा प्रवास 145

हलकी वाहनं/मिनी बस -

एकेरी प्रवास155

परतीचा प्रवास235

बस/ट्रक (2 अॅक्सल) -

एकेरी प्रवास 325

परतीचा प्रवास490

3 अॅक्सल व्यावसायिक वाहन -

एकेरी प्रवास 355

परतीचा प्रवास535

बहुअॅक्सल वाहन -

एकेरी प्रवास 510

परतीचा प्रवास 765

7 किंवा अधिक अॅक्सल वाहन -

एकेरी प्रवास 610

परतीचा प्रवास 915

रस्त्याची काम अर्धवट..,रस्त्यावर खडी पडलेली असताना सुरू झालेल्या या टोल वसुली विरोधात वाहनधारकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. गेल्या दीड दशकात राज्यात सत्तेत आलेल्या सर्वच पक्षांनी या महामार्गासाठी केवळ आश्वासने दिली आहेत. एकीकडे समृद्धी महामार्ग झाला. मुंबई-पुणे एक्स्रप्रेस वेवर मिसिंग लिंकही सुरु झाला. मात्र मुंबई-गोवा महामार्ग काम रखडलेलंच आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com