Shruti Vilas Kadam
किसलेला कोबी, गाजर, शिमला मिरची, कांद्याची पात, आले-लसूण पेस्ट, मैदा, कॉर्नफ्लोअर, मीठ, काळी मिरी, सोया सॉस, रेड चिली सॉस, टोमॅटो सॉस, व्हिनेगर, तेल आणि पाणी.
एका भांड्यात किसलेल्या भाज्या, मैदा, कॉर्नफ्लोअर, मीठ आणि मिरी घालून मिश्रण एकजीव करा. आवश्यक असल्यास थोडे पाणी घालून छोटे-छोटे गोळे तयार करा.
कढईत तेल गरम करून तयार केलेले गोळे मध्यम आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. नंतर अतिरिक्त तेल निघण्यासाठी टिश्यू पेपरवर ठेवा.
पॅनमध्ये थोडे तेल गरम करून आले-लसूण परता. त्यानंतर कांद्याची पात, सोया सॉस, रेड चिली सॉस, टोमॅटो सॉस आणि व्हिनेगर घालून चांगले मिसळा.
एका वाटीत कॉर्नफ्लोअर आणि पाणी एकत्र करून स्लरी तयार करा. ती सॉसमध्ये घालून सतत ढवळा. त्यामुळे ग्रेव्ही छान घट्ट होईल.
तयार ग्रेव्हीत मंच्यूरियन बॉल्स घालून हलक्या हाताने मिसळा. 2 ते 3 मिनिटे शिजू द्या, जेणेकरून बॉल्समध्ये सॉसची चव मुरेल.
वरून चिरलेली कांद्याची पात घालून गरमागरम मंच्यूरियन सर्व्ह करा. हा पदार्थ फ्राईड राईस, हक्का नूडल्स किंवा सूपसोबत अधिक स्वादिष्ट लागतो.