Shocking akola  Saam tv
महाराष्ट्र

Shocking : नीट परीक्षेआधीच २ विद्यार्थ्यांनी संपवलं आयुष्य; दोन्ही कुटुंबांना मोठा धक्का, नक्की काय घडलं?

Shocking akola News : नीट परीक्षेआधीच २ विद्यार्थ्यांनी संपवलं आयुष्य संपवलं आहे. दोघांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

Vishal Gangurde

अक्षय गवळी, साम टीव्ही

अकोल्यातून खळबळजनक घटना समोर आली आहे. अकोल्यात नीट अभ्यासक्रमाचा सराव करणाऱ्या २ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दोन्ही विद्यार्थ्याचं वय १७ आणि १८ असं होतं. दोघांच्या आमहत्येचं कारण समजू शकलेलं नाही. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

अकोल्यात नीट अभ्यासक्रमाचा सराव करणाऱ्या २ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. 17 वर्षीय पार्थ गणेश नेमाडे आणि 18 वर्षीय अर्णव नागेश देबाजे असं या आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याची नाव आहे. पार्थ नेमाडे हा तेल्हारा तालुक्यातील रायखेड येथील रहिवासी होता. तो अकोल्यातील न्यू अकॅडमी येथे शिकवणी वर्गात होता.

अर्णव देबाजे हा अकोल्यातील मोठी उमरी भागातील रहिवासी होता. दोन्ही विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. दोघेही विद्यार्थी नीट अभ्यासक्रमाचा सराव करीत होते. दोन्ही विद्यार्थ्यांनी परीक्षेआधी केलेल्या आत्महत्येने अकोल्यात खळबळ उडाली आहे.

अकोल्यातील पार्थ गणेश नेमाडे याने घरात विषारी औषध प्यायलं. ही बाब त्याच्या कुटुंबीयांना समजली. कुटुंबीयांनी तातडीने पार्थला रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी पार्थला मृत घोषित केले. तर अर्णबलाही त्याच्या नातेवाईकांनी उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. त्यानंतर अर्णबचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शवगृहात ठेवण्यात आला. दोघांच्या मृत्यूने अकोल्यात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी बीडमधील नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. लातूरमधील राहत्या खोलीतच त्याने आत्महत्या केली. अनिकेत अंकुश कानगुडे असे विद्यार्थ्याचे नाव आहे. तो अनेक वर्ष कोचिंग क्लासमध्ये नीट परीक्षेची तयारी करत होता. मागील परीक्षेत त्याला ५२० गुण मिळाले होते. मात्र तरीही अनिकेतला वैद्यकीय प्रवेश मिळाला नव्हता. त्यामुळे तो नीट परीक्षेची तयारी करत होता. पण परीक्षेच्या एका दिवसाआधीच त्याने आत्महत्या केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: मुंबईच्या २४ वर्षीय महिलेवर दुबईत सामूहिक बलात्कार; ५ सहकाऱ्यांच्या वासनेची बळी पडली

Maharashtra Politics: फडणवीस करणार मंत्रिमंडळाची साफसफाई, मंत्रिमंडळात फेरबदल, 8 विकेट पडणार?

Maharashtra Politics: यापुढे माझ्या अध्यक्षतेखाली बैठका घ्या! राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यावर शिरसाट संतापले

पालकांनो मुलांना सांभाळा,12 व्या मजल्यावरून पडून चिमुकलीचा मृत्यू

Fatty Liver In Women's: फॅटी लिव्हर असल्यास महिलांमध्ये दिसतात 'अशी' लक्षणे

SCROLL FOR NEXT