Maharashtra Rain Update : ऐन उन्हाळ्यात पावसाचा धुमाकूळ, शेती पिकांचं मोठं नुकसान; 'या' जिल्ह्यांना अवकाळीने झोडपलं

Maharashtra Rain Update in Marathi : ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
Maharashtra Rain
Maharashtra Rain UpdateSaam tv
Published On

राज्यातील शेतकऱ्यांना मान्सून सुरु होण्याची प्रतीक्षा लागली आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्रातील नाशिक, बुलडाणा आणि लातूरला अवकाळी पावसाने झोडपलं आहे. अमरावतीला शनिवारी अवकाळी झोपडलं. या पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं. या अवकाळीमुळे शेतकरी राजा हवालदिल झाला आहे.

नाशकात अवकाळीने शेतकरी हवालदिल

नाशिकमध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. नाशिक शहरासह काही भागात मुसळधार पाऊस पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. विजेच्या कडकडासह जोरदार पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची देखील चांगली तारांबळ उडालाच पाहायला मिळत आहे.

नाशिकमध्ये अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेती पिकांच देखील मोठं नुकसान झाल्याच पाहायला मिळत आहे. मात्र सध्या पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या शेती पिकाचा अधिक नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हवामान खात्याने दोन दिवस पावसाचा येलो अलर्ट दिला आहे.

लातूरला पावसाने झोडपलं

लातूर शहरासह ग्रामीण भागात अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला आहे. सकाळपासूनच वातावरणात उकाडा जाणवत होता, तर वातावरणीय बदल झाल्याने वादळी वारा आणि मेघगर्जनेसह तुफान पाऊस झाला. यादरम्यान अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे व्यापाऱ्यांची आणि शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ देखील झाल्याची पाहायला मिळाली. सलग १ तास पाऊस कोसळल्याने वातावरणात काहीसा गारवा निर्माण झालाय. तर ग्रामीण भागातल्या अनेक ठिकाणी शेती पिकांचे नुकसान देखील झाल्याची माहिती समोर येत आहे.

Maharashtra Rain
Chhatrapati Shivaji Maharaj : राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे लोकार्पण; काय आहेत प्रमुख वैशिष्ट्ये? वाचा

बुलडाण्यात पावसाची दमदार हजेरी

बुलडाण्यातील खामगाव तालुक्यात मुसळधार अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसामुळे उकाडा कमी झाला आहे. तर हवेत थोडाफार गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. मात्र या पावसाने उन्हाळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे.न

Maharashtra Rain
Bob Cowper Death : क्रीडाविश्वावर शोककळा, दिग्गज क्रिकेटपटू काळाच्या पडद्याआड, टेस्टमध्ये ठोकलं होतं त्रिशतक

अमरावती वादळी वाऱ्यासह पाऊस

अमरावतीत शनिवारी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अमरावतीच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. पावसामुळे सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक परिसरात वीजपुरवठा खंडित झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com