Akola Crime : दुकानात घुसून चतुराईने दागिने चोरी; सहा तासात चोरीचा उलगडा, महिला ताब्यात

Akola News : महिलेने चेहऱ्यावर स्कार्फ बांधुन सेल्समनला सोन्याच्या चैन दाखविण्यास सांगितल्या. समोर चैनचा ट्रे ठेवला असता महिलेने पाहणी करताना नजर चुकवुन चार आणि २० ग्रॅम वजनाच्या दोन चैन चोरी केल्या
Akola Crime
Akola CrimeSaam tv
Published On

अक्षय गवळी 

अकोला : अकोला शहरातल्या मलाबार गोल्ड अँड डायमंड या सोन्याच्या दागिन्याच्या दुकानात चतुराईने ग्राहक बनुन आलेल्या एका अनोळखी महिलेने चेहऱ्यावर स्कार्फ बांधुन चोरी केली होती. हा संपूर्ण प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला. अडीच लाख रुपये किंमतीची चैन चोरी प्रकरणाचा अकोला पोलिसांनी अवघ्या सहा तासातच उलगडा केला असून चोरी करणाऱ्या महिलेस ताब्यात घेतले आहे. 

अकोला शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या मलाबार गोल्ड अंड डायमंड या सुवर्ण अलंकार असलेल्या दुकानात ८ मे रोजी एक महिला ग्राहक आली होती. या महिलेने चेहऱ्यावर स्कार्फ बांधुन दुकानातील सेल्समनला सोन्याच्या चैन दाखविण्यास सांगितल्या. समोर सोन्याच्या चैनचा ट्रे ठेवला असता महिलेने ट्रे ची पाहणी करताना नजर चुकवुन चार आणि २० ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या चैन चोरी केल्या. 

Akola Crime
Accident News : आजी- आजोबांदेखत दोन्ही नातवांचा मृत्यू, शेगावजवळ भीषण अपघात, संतप्त जमावाने डंपर पेटविले

महिला गेल्यानंतर प्रकार उघड 
महिला दुकानातून निघून गेल्यानंतर कर्मचाऱ्याने सोन्याच्या चैनच्या ट्रे पाहिला असता यातून ४२ हजार रुपये किंमतीची ४ ग्रॅमची चैन व २ लाख ६ हजार ६२२ किंमतीची २० ग्रॅमची चैन आढळून आली नाही. यानंतर दुकानातील सीसीटीव्ही पहिले असताना महिलेने चोरी केल्याचे दिसून आले. यानंतर या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. 

Akola Crime
Vitthal Mandir : भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात सुरक्षा व्यवस्था अलर्ट; तपासणी करूनच भाविकांना प्रवेश

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे महिला ताब्यात 

दरम्यान सदर चोरी प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली असताना दुसऱ्या ऐका ज्वलेर्स येथे देखील महिलेने अशाच प्रकारे चोरी करण्याचा प्रयत्न केला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अखेर चोरी करणारी महिला पोलिसांच्या तावडीत सापडली. पोलिसांनी तिच्याकडून चोरी केलेला मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com