Vitthal Mandir : भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात सुरक्षा व्यवस्था अलर्ट; तपासणी करूनच भाविकांना प्रवेश

Pandharpur News : पहलगाम घटनेनंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करत कारवाई केली. त्यानंतर तीन चार दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान मध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला
Pandharpur Vitthal Mandir
Pandharpur Vitthal MandirSaam tv
Published On

पंढरपूर : भारत पाकिस्तान मध्ये सुरू असलेल्या युध्दाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील प्रमुख ठिकाणांवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. यात महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचे असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल- रुक्मिणी मंदिरातील सुरक्षा व्यवस्था देखील अलर्ट झाली आहे. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची तपासणी करूनच दर्शनासाठी सोडले जात आहे. दरम्यान मंदिर परिसरात येणाऱ्या वाहनांची तपासणी केली जात आहे.

जम्मू- काश्मीर मधील पहलगाम घटनेनंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करत मोठी कारवाई केली. त्यानंतर मागील तीन चार दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान मध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. तर कालपासून भारताने पाकिस्तान विरोधात अधिक कडक कारवाई सुरू केली आहे. यामुळे देशभरातील प्रमुख शहरांसह काही ठिकाणावर अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

Pandharpur Vitthal Mandir
India Vs Pakistan : मोदींना मित्र बनवा, पाकिस्तान वाचवा; पाकिस्तानी तरूणाचा व्हिडिओ व्हायरल

मंदिर परिसरात सशस्त्र पोलीस तैनात 

भारत- पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण भारताची काशी अशी ओळख असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील व परिसरात पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. मंदिराच्या व्हीआयपी गेट समोर सशस्त्र पोलिस तैनात करण्यात आले आहेत. तर संत नामदेव पायरी, दर्शबारी आणि मंदिरात देखील पोलिसांची सुरक्षा वाढवली आहे. मंदिरात येणाऱ्या प्रत्येकाची कसून तपासणी केली जात आहे. 

Pandharpur Vitthal Mandir
Accident News : आजी- आजोबांदेखत दोन्ही नातवांचा मृत्यू, शेगावजवळ भीषण अपघात, संतप्त जमावाने डंपर पेटविले

मंदिराची दोन वेळा तपासणी 

दरम्यान मंदिराची दिवसभरातून दोन‌ वेळा तपासणी केली जात आहे. तसेच भाविकांच्या वस्तू आणि बॅगचे स्कॅनिंग केले जात आहे. तर भाविकांना‌ आणि नागरिकांना संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू आढळून आल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा; असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जून भोसले यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com