eknath shinde  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: महाविकास आघाडीला खिंडार! ठाकरे गट आणि काँग्रेसच्या नेत्यांचे आऊट गोईंग सुरू, 'धनुष्यबाण' घेणार हाती

Shiv Sena (UBT) and Congress Take Hit as Leaders Join Shinde Faction: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये गळती सुरू असून, शिंदे गटात इनकमिंग सुरूच आहे.

Bhagyashree Kamble

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर येत्या चार महिन्यांत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. निवडणुका लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर राज्यभरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. अशा पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या शिवसेनेला आणि काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. दोन्ही पक्षांतील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे.

ठाकरे गटाला मोठा धक्का

मावळ तालुक्यात शिवसेना (शिंदे गट) मध्ये जोरदार इनकमिंग सुरू असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत नाणे मावळमधील अनेक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मुंबईत शिंदे गटात अधिकृत प्रवेश केला आहे.

या सोहळ्यात मदन शेळगी (तालुका संघटक), उपतालुका उपप्रमुख सोमनाथ कुंडे, तसेच कामशेत शहरातील उबाठा गटाचे उपशहरप्रमुख सुरेश लाड यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

काँग्रेसलाही गळती

मावळ तालुक्यात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेश वाघोले यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत शिवसेना शिंदे गटात अधिकृत प्रवेश केला आहे. मुंबई येथे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राजेश वाघोले यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे.

या प्रवेश सोहळ्याला मावळचे खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर तसेच अनेक ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोल्हापुरात प्रेमीयुगुलाच्या प्रेमाचा भयानक शेवट; जंगलात आढळले दोघांचे मृतदेह, परिसरात खळबळ

Collar Blouse Designs : स्टाइल में रहने का...; कॉलर ब्लाउजच्या 5 सुंदर पॅटर्न्स, साडीला येईल मॉडर्न लूक

Maharashtra Live News Update : दिवाळीला आपल्या घरची लक्ष्मी कमळावर होती, त्यामुळे जालन्याच्या विकासाची लक्ष्मी सुद्धा ही कमळावर येणार आहे- चंदशेखर बावनकुळे

अजित पवारांच्या 6 बैठकांना दांडी; शहांच्या भेटीनंतर धनंजय मुंडे अन् CM फडणवीस एकाच व्यासपीठावर, चर्चांना उधाण

Contrast Colour Matching saree: कोणत्या रंगावर कोणता रंग सर्वात जास्त उठून दिसेल? सध्या 'या' 5 रंगांच्या जोड्या आहेत ट्रेडिंगमध्ये

SCROLL FOR NEXT