
भारत आणि पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थिती आणखी चिघळत असताना मुंबईच्या साकीनाका परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ ड्रोन दिसल्याची माहिती मिळाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला पहाटे सव्वा पाच वाजता फोनद्वारे माहिती मिळाली की साकीनाका परिसरातील हजरत तय्यद जलाल (बैगन शाहा दर्गा) मशिदीच्या वर ड्रोन फिरत आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ड्रोन झोपडपट्टी भागात गायब
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ ड्रोन फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर काही वेळाने हा ड्रोन झोपडपट्टी भागात नाहीसा झाला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने कॉम्बिंग ऑपरेशन सुरू केले असून, ड्रोन उडवणाऱ्याचा शोध सुरू आहे.
विमानतळाजवळ ड्रोनला कडक बंदी
विमानतळ आणि परिसरात ड्रोन उड्डाणावर कडक बंदी आहे. अशा परिस्थितीत युद्धजन्य वातावरणात असा प्रकार घडणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे पोलिस, सीआयएसएफ, एटीएस आणि अन्य सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत.
सध्या तपास सुरू आहे आणि लवकरच अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास किंवा आढळल्यास नागरिकांनी त्वरित पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.