"पाकिस्तान जिंदाबाद" युवकाला स्टेट्स ठेवणं पडलं महागात; धिंड काढत नागरिकांनी कपडे फाटेपर्यंत चोपलं | Ratnagiri

Pro-Pakistan Post Sparks Anger in Ratnagiri: रत्नागिरीतील एका युवकाने सोशल मीडियावर पाकिस्तान झिंदाबाद असे इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवले होते. याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Ratnagiri
RatnagiriSaam
Published On

भारत आणि पाकिस्तानमधील युद्धजन्य तणाव वाढत असताना रत्नागिरीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोकणनगरमधील महम्मद बद्रुद्दीन परकार या युवकाने आपल्या इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप स्टेटसवर "पाकिस्तान जिंदाबाद…" असे स्टेट्स ठेवले होते. या प्रकरणी संतप्त नागरिकांनी युवकाला बेदम चोपलं, तसेच त्याची धिडं काढली. या प्रकरणी संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महम्मद बद्रुद्दीन परकार असे युवकाचे नाव आहे. त्याने इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपवर "पाकिस्तान जिंदाबाद… मोदी किलर आहे… मोदीमुळे हे घडत आहे… पाकिस्तानसाठी प्रार्थना करा" असे स्टेटस ठेवले होते. युवकाने स्टेट्स ठेवताच क्षणात हे पोस्ट व्हायरल झाले. परिसरातील नागरिकांना या पोस्टविषयी माहिती मिळताच त्यांना राग अनावर झाला.

Ratnagiri
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर भारताचा पाकिस्तानला आणखी एक मोठा झटका

परिसरातील नागरिकांनी परकारला पकडून बेदम चोप दिला आहे. त्याचे कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण केली. यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परकारला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तसेच संतप्त नागरिकांना पोलिसांनी शातंता राखण्याचे आवाहन केले.

Ratnagiri
Operation Sindoor: कुंकू पुसणाऱ्यांचं नामोनिशान मिटवलं, कोणत्या पॉवरफुल्ल मिसाइलनं पाकड्यांना पाताळात गाडलं!

या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात परकारविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस अधिक तपास करत आहेत. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Ratnagiri
Crime: आई कामावर अन् घरी सावत्र बापाकडून मुलीवर लैंगिक अत्याचार, आईला कळताच भररस्त्यावर झोडलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com