Crime
CrimeSAAM TV

Crime: आई कामावर अन् घरी सावत्र बापाकडून मुलीवर लैंगिक अत्याचार, आईला कळताच भररस्त्यावर झोडलं

Stepfather Accused of physically Assaulting: सावत्र बापाने १० वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. याची माहिती मुलीच्या आईला समजताच तिने बापाला भररस्त्यावर बेदम मारहाण केली आहे.
Published on

अहमदाबादमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. सावत्र बापाने १० वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. याची माहिती मुलीच्या आईला समजताच तिने बापाला भररस्त्यावर बेदम मारहाण केली आहे. या घटनेनंतर पीडित मुलीच्या आईने नारोळ पोलीस ठाण्यात धाव घेत नराधम बापाविरोधात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी आरोविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पीडित मुलीचे वडील वारले. त्यामुळे पीडित मुलीच्या आईने दुसरे लग्न केले होते. मुलींनाही बापाचं प्रेम मिळेल या हेतूने तिने दुसरे लग्न केले होते. मात्र, बाप हा नराधम निघाला. त्याचा डोळा आपल्याच सावत्र मुलीवर होता. त्याने १० वर्षीय मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केला. तो तब्बल ४ वर्ष आपल्या सावत्र मुलीवर लैंगिक अत्याचार करत राहिला.

Crime
ऑपरेशन सिंदूर कसं राबवलं? पाकिस्तानच्या नांग्या कशा ठेचल्या? अभ्यासकांनी दिली इत्यंभूत माहिती | Operation Sindoor

लहान मुलीकडून याची माहिती मिळाल्यानंतर पीडित मुलीच्या आईची तळपायाची आग मस्तकात गेली. पीडित मुलीने आपल्या आईला आपबिती सांगितली. पीडित मुलीची आई कामावर गेल्यानंतर नराधम बाप लवकर घरी घेऊन मुलीवर लैंगिक अत्याचार करत असल्याची माहिती पीडित मुलीच्या आईने पोलिसांना दिली. तसेच नराधम आपल्या मुलींना मारहाण करून धमकीही देत असल्याची माहिती समोर आली आहे.

Crime
PAK Anchor: लाईव्ह बुलेटीनमध्ये पाकिस्तानी अँकर ढसाढसा रडली, अल्लाहकडे केली प्रार्थना; नेटकरी म्हणाले 'मगरमच्छ के आंसू'

पीडित मुलीने याची माहिती आईला दिल्यानंतर तिने थेट नारोळ पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. त्यांनतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली. अटक केल्यानंतर पोलिसांनी आरोपीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com