आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला बारामतीच्या जवळच असलेल्या इंदापूर तालुक्यात मोठे खिंडार पडले आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये माजी नगरसेवक, माजी नगराध्यक्ष यांच्यासह अनेक कार्यकर्त हे घडयाळ बांधणार आहे.
इंदापूर शहरातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या तंबूतून तीन महत्वाचे शिलेदार लवकरच कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. या तिन्ही नेत्यांमध्ये माजी नगराध्यक्ष अशोक इजगुडे, हर्षवर्धन मोटार वाहतूक संघाचे माजी अध्यक्ष रघुनाथ राऊत, तसेच माजी नगरसेवक गोरख शिंदे यांचा समावेश आहे. हे तिघेही लवकरच म्हणजे येत्या दोन दिवसांत मुंबईत औपचारिकरीत्या उपमुख्यमंत्री अजित पवार व कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार आहेत.
या घडामोडीमुळे इंदापूरच्या राजकारणात मोठी हलचल निर्माण झाली असून, दत्तात्रय भरणे यांची ही चाल हर्षवर्धन पाटील यांच्या गोटासाठी मोठा धक्का मानली जात आहे.राजकीय वर्तुळात आता चर्चा रंगली आहे की कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूरात ही मोठी राजकीय खेळी खेळली आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या निष्ठावंत मानल्या जाणाऱ्या या तिन्ही कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश झाल्यानंतर आगामी निवडणुकांवर याचा थेट परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे..
हर्षवर्धन पाटील आणि दत्ता भरणे यांचा राजकीय संघर्ष हा सर्वश्रुत आहे. विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान इंदापुरची जागा ही राष्ट्रवादी अजित पवार गटाला सुटल्याने हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला सोडचिटी देत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र पाटील यांचा पराभव झाला. त्यांनंतर दोघांमधील संघर्ष वाढतच गेला आणि आता पुन्हा एकदा भरणे यांनी पाटील यांचे निकटवर्तीय गळाला लावले आहे. येणाऱ्या निवडणुकीत याचा कितपत परिणाम होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.