मनोज जयस्वाल
वाशीम : राज्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे खरिपाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील २० लाख १२ हजार ७७५ एकर क्षेत्राच्यावर पिकांचे नुकसान झाले आहे. राज्यातील ११ जिल्ह्यात दहा हजार हेक्टरपेक्षा जास्त बाधित झाले आहेत. यात सर्वाधिक नुकसान नांदेड आणि वाशिम जिल्ह्यात झाले असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
साधारण आठवडाभरापासून राज्यातील वेगवेगळ्या भागात जोरदार पाऊस सुरु आहे. अनेक भागात तर अतिवृष्टी झाली असल्याने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून या नुकसानीचे पंचनामे सुरू असून अहवाल मिळाल्यानंतर तात्काळ शेतकऱ्यांना मदत दिली जाईल. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
१९ जिल्ह्यात झाला मुसळधार पाऊस
राज्यातील तब्बल १९ जिल्ह्यांमधील १८७ तालुके आणि ६५४ महसूल मंडळांमध्ये मुसळधार पाऊस झाला असून मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार ८ लाख ५ हजार ११० हेक्टर म्हणजे तब्बल २० लाख १२ हजार ७७५ एकर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये १० हजार हेक्टरपेक्षा जास्त नुकसानग्रस्त क्षेत्र असलेले ११ जिल्हे समोर आले आहेत.
वाशीम, नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान
मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका नांदेड व वाशिम जिल्ह्याला बसला आहे. यात वाशीम जिल्ह्यात अतिवृष्टीचा ३५० गावांना फटका बसला असून यात ४ लाख ११ हजार ३९२ एकरवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याशिवाय सर्वाधिक नुकसानग्रस्त जिल्ह्यांमध्ये नांदेड (२,८५,५४३ हे.), यवतमाळ (८०,९६९ हे.), बुलढाणा (७४,४०५ हे.), अकोला (४३,७०३ हे.), सोलापूर (४१,४७२ हे.) आणि हिंगोली (४०,००० हे.) या जिल्ह्याचा समावेश आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.