Jalgaon-Mumbai Flight: आनंदाची बातमी! आता जळगाववरून दीड तासात मुंबई गाठा; जाणून घ्या विमान उड्डाणांचे वेळापत्रक

Jalgaon-Mumbai Flight: अलायन्स एअरने जळगाव आणि मुंबई दरम्यान दैनंदिन विमानसेवा सुरू केली आहे. प्रवासी आता जळगावहून फक्त ९० मिनिटांत मुंबईला पोहोचू शकणार आहेत. जळगाववरून कोण-कोणत्या शहरांसाठी उड्डाण असणार आहेत, याची महिती घेऊ.
Jalgaon-Mumbai Flight
Alliance Air launches daily Jalgaon–Mumbai flights; now reach Mumbai in just 1.5 hours from Jalgaon.saam tv
Published On
Summary
  • जळगाव-मुंबई दरम्यान दररोजची विमानसेवा सुरू

  • प्रवाशांच्या मागणीनंतर दररोजची सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

  • जळगाववरून मुंबई गाठण्यासाठी अवघ्या दीड तासाचा वेळ लागेल.

अवघ्या काही मिनिटात जळगावरून तुम्ही मुंबई, पुण्याला पोहचू शकणार आहात. आता जळगाव विमानतळावरून दररोज विमानसेवा सुरू करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत आठवड्यातून फक्त चार दिवस विमानांचे उड्डाण होत होती. मात्र प्रवाशांच्या वाढत्या मागणीमुळे अलायन्स एअर या विमान कंपनीने दररोजची सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय.

या नव्या व्यवस्थेनुसार प्रवासी आता अवघ्या दीड तासात जळगावहून थेट मुंबई गाठू शकणार आहात. ही सेवा सुरू झाल्याने व्यापारी, उद्योगपती, विद्यार्थी आणि नोकरदार वर्गाला मोठा फायदा होणार आहे. या विमानसेवेमुळे प्रवासाचा वेळ वाचणार आहे. जळगाव विमानतळ सध्या केंद्र सरकारच्या “उडान” योजनेच्या (UDAN Scheme) अंतर्गत कार्यरत आहे. या योजनेखाली गोवा, पुणे, हैदराबाद, मुंबई आणि अहमदाबाद अशा पाच प्रमुख शहरांसाठी विमान सेवा सुरू करण्यात आली आहे.

मुंबईसह जळगाव मार्गे अहमदाबाद विमानसेवा देखील पुन्हा सुरू करण्यात आलीय. त्यामुळे गुजरात आणि महाराष्ट्रातील व्यावसायिकांना प्रवास करणं सुलभ होणार आहे. दरम्यान जळगाव–मुंबई विमानसेवेसाठी तब्बल ७० टक्के प्रवाशांनी ॲडव्हान्स बुकिंग केलंय. दरम्यान जळगाव–मुंबई दररोजच्या उड्डाणामुळे जिल्ह्याच्या वाहतूक वाढेल. यामुळे पर्यटन, उद्योग आणि शिक्षण क्षेत्रालाही नवसंजीवनी मिळेल अशी आशा वर्तवली जात आहे.

जळगाव विमानतळावरून सुरू असलेल्या विविध विमानसेवांसाठीचे नवे हिवाळी वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. गोवा, पुणे, हैदराबाद, मुंबई आणि अहमदाबाद या मार्गांसाठी वेळांमध्ये काही बदल करण्यात आलेत.

नवीन वेळापत्रक जाणून घ्या

गोवा–जळगाव

सोमवार ते रविवार - गोव्यातून दुपारी 12:10 वाजता वमानाचे उड्डाण होईल. त्यानंतर दुपारी 1:50 वाजता विमान जळगावात पोहोचेल. मात्र शनिवारी या वेळापत्रकात बदल करण्यात आलाय. शनिवारी हे विमान दुपारी 2:30 वाजता गोव्यातून निघून 4:20 वाजता जळगावात पोहोचेल.

जळगाव–गोवा

सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार आणि रविवार - विमान सायंकाळी 5:35 वाजता जळगावहून निघेल. तर 7:20 वाजता गोव्यात पोहोचेल.

बुधवारी - 6:05 वाजता विमान जळगावहून उड्डाण करेल. तर रात्री 8:05 वाजता हे विमान गोव्यात पोहोचेल. शनिवारी रात्री 8:25 वाजता जळगावहून उड्डाण भरेल तर 10:25 वाजता गोव्यात पोहोचेल.

जळगाव–पुणे

सोमवार ते रविवार - दुपारी 2:10 ते 3:30 वाजेपर्यंत प्रवास पूर्ण होईल.

शनिवारी- 4:40 ते 6:00

पुणे–जळगाव

सोमवार ते रविवार - दुपारी 3:50 ते 5:15

शनिवारी - 7:00 ते 8:05

जळगाव–हैदराबाद

दररोज

6:25 ते 8:45

हैदराबाद–जळगाव

दररोज - 4:25 ते 6:05

मुंबई–जळगाव–मुंबई

मंगळवार, गुरुवार आणि शनिवार

8:00 ते 8:35

. सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवार - दुपारी 4:20 ते 4:45 ला मुंबईला पोहचणार.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com