Patan, Karad News , Landslide Area saam tv
महाराष्ट्र

Mirgaon News : दरड काेसळलेल्या ठिकाणाची सातारा जिल्हाधिका-यांकडून पाहणी, ग्रामस्थांना केली विनंती...

Satara Mirgaon Landslide : जिवित व वित्तहानी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे

Siddharth Latkar

Patan News : दरड प्रवण गावातील नागरिकांनी तात्पुरत्या निवारा केंद्रांमध्ये स्थलांतरित व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी (satara collector jitendra dudi) यांनी केले. जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पाटण तालुक्यातील दरडग्रस्त गावांची पाहणी जिल्हाधिकारी डुडी यांनी केली. त्यावेळी त्यांनी ग्रामस्थांना आवाहन केले. (Maharashtra News)

स्थलांतरितांसाठी उभारण्यात आलेल्या निवारा केंद्रांमध्ये पाणी, वीज यासह नागरी सुविधा उभारण्यात आल्या असल्याचे सांगून जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, ज्या ज्या वेळी जिल्ह्याला रेड आणि ऑरेंज अलर्ट असेल त्यात्या वेळी दरड प्रवन व धोकादायक गावांमधील नागरिकांना तातडीने निवारा केंद्रांमध्ये हलविण्याची कार्यवाही स्थानिक प्रशासनाने करावी.

यास गावांमधील नागरिकांनी सहकार्य करावे. जिल्ह्यात सध्या अतिवृष्टीचा इशारा आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी व प्रशासनाने खबरदारी घ्यावी, निवारा केंद्र उभारण्यात आली आहेत तसेच काही शाळा व काही मंगल कार्यालये ही निवारा केंद्र म्हणून तयार करण्यात आली आहेत. या ठिकाणी नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही. त्यामुळे रेड आणि ऑरेंज अलर्ट मिळाल्यानंतर नागरिकांनी तातडीने या निवारा केंद्रांमध्ये स्थलांतरित व्हावे असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी जिल्हाधिकारी डुडी यांनी मीरगाव येथील ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांना निवारा केंद्रांमध्ये जाण्याविषयी सांगितले. तसेच अतिवृष्टीमुळे साकव वाहून गेलेल्या चाफेर गावास भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. ओझर्डे येथील दरड कोसळलेल्या ठिकाणची ही त्यांनी पाहणी केली व याबाबत करण्यात येत असलेल्या कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेतला.

जिल्हा प्रशासनाकडून नागरीकांना आवाहन

अतिवृष्टीमुळे दरडी कोसळणे/भूस्खलनामूळे धोका निर्माण होणाऱ्या गावातील नागरिकांनी अतिवृष्टीच्या कालावधीत सतर्क रहावे. धोकादायक स्थतीत अथवा मोडकळीस आलेल्या घरात राहू नये. स्वत:हून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे.

धोकादायक ठिकाणी शक्यतो प्रवास टाळावा. कडा कोसळणे/दरडी कोसळण्याच्या ठिकाणी थांबू नये.

अतिवृष्टीचे काळात मोठया प्रमाणात डोंगरातून पाण्याचा प्रवाह सुरु असतो, ओढे-नाले पात्र भरुन वाहत असतात अशावेळी पूराच्या पाण्यात /ओढयातून प्रवास टाळावा. तसेच नदी, ओढ्यानाल्यावरील पुलावरुन पाणी वाहत असल्यास धोकादायक स्थितीमध्ये पूल ओलांडू नये.

जिवित व वित्तहानी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करावे.

पर्यटनाचे ठिकाणी उदा. धबधबे, तलाव इ. ठिकाणी धोकादायक ठिकाणी प्रवेश करु नये. त्याचप्रमाणे धोकादायक ठिकाणी फोटो काढण्याचे अथवा सेल्फी घेण्याचा मोह टाळावा.

नदी अथवा नाल्याची पाणी पातळी वाढल्यास कोणत्याही परिस्थितीत नदी पात्रात प्रवेश करु नये.

अतिवृष्टीच्या कालावधीत तात्काळ सुरक्षित जागेत (नातेवाईक,समाजमंदिर,शाळा इ.ठिकाणी) स्वत: हून स्थलांतरित व्हावे.

मान्सून कालावधीत साथीच्या रोगांपासून वाचण्यासाठी शक्यतो पाणी उकळून गार करुन प्यावे.

विजा कडकडत असताना कोणत्याही परिस्थितीत झाडाखाली आश्रय घेऊ नये. (पाण्यात असल्यास तात्काळ बाहेर पडावे).

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT