Dharmarao Baba Atram : धर्मरावबाबा आत्राम यांना धमकी, पाेलिसांनी नक्षलवाद्यांना दिले ठाेस उत्तर

आत्राम आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आदिवासींचे जंगल - जमीन उध्वस्त केल्याची किंमत चुकवावी लागेल, असा इशारा पत्राद्वारे देण्यात आला आहे.
Dharmarao Baba Atram, Gadchiroli
Dharmarao Baba Atram, Gadchirolisaam tv
Published On

- संजय डाफ / मंगशे भांडेकर

Gadchiroli News : प्रस्तावित खाणीवरुन नक्षलवाद्यांनी मंत्री धर्मरावबाबा आत्राम (Dharmarao Baba Atram) यांना धमकी दिल्याने पाेलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. दरम्यान आत्राम यांच्या सुरक्षेची काळजी कडेकाेट घेतली जात आहे असे संदीप पाटील (डीआयजी, नागपूर गडचिरोली परिक्षेत्र) यांनी साम टीव्हीशी बाेलना नमूद केले.

Dharmarao Baba Atram, Gadchiroli
Nagar News : महिला, मुलींच्या सुरक्षिततेसाठी वेळप्रसंगी कायदा हातात घेऊ : भाजपच्या माजी मंत्र्यांचा पोलिसांना इशारा

नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोहखनिज प्रकल्प आणि प्रस्तावित 6 नव्या लोह उत्खनन प्रकल्पांना विरोध केला आहे. सिपीआय माओवादी संघटनेचा पश्चिम सब झोनल ब्युरो गडचिरोलीचा प्रवक्ता श्रीनिवास याने यासंदर्भात पत्रक जारी केले आहे.

Dharmarao Baba Atram, Gadchiroli
Khed Rain Updates : वशिष्ठी, 'सावित्री'चा काढता, जगबुडी नदीचा गाळ का काढला जात नाही ?

स्थानिक आमदार आणि नवनियुक्त मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी सर्वच कॉर्पोरेट घराण्यांना पाठींबा दिला असल्याबद्दल संतापही व्यक्त केला आहे. आत्राम आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आदिवासींचे जंगल - जमीन उध्वस्त केल्याची किंमत चुकवावी लागेल, असा इशाराही पत्राद्वारे दिला आहे.

आत्राम यांनी घराण्यांची दलाली चालविली असल्याचा आरोप करत महाराष्ट्र- छत्तीसगड सीमेवर तोडगट्टा येथे सुरू असलेले खाणविरोधी आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहनही केले आहे.

Dharmarao Baba Atram, Gadchiroli
Chandrapur Rain Updates : करंजी गावातील 150 पेक्षा अधिक घरे पाण्यात, आक्सापूरचा तलाव फुटला

दरम्यान सुरजागडसह गडचीरोली (gadchiroli) जिल्ह्यात सहा नविन खाणींना पाठिंबा दिल्यामुळे नक्षलवाद्यांनी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना दिलेल्या धमकीनंतर गडचीरोली पोलीस विभाग सतर्क झाला आहे.

“मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना सध्या झेड सुरक्षा आहे. त्यांच्या सुरक्षेचा कुठलाही प्रश्न निर्माण होणार नाही. त्यामुळे नक्षलवाद्यांची (naxals) धमकीकडे लक्ष देण्याची गरज नाही.” असं गडचिरोली परीक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरिक्षक संदीप पाटील यांनी साम टीव्हीशी बाेलताना नमूद केले.

Dharmarao Baba Atram, Gadchiroli
Gosikhurd Dam News : सावधान ! 'गोसीखुर्द'चे सर्व 33 दरवाजे उघडले, चंद्रपूरसह गडचिरोलीला बसणार बँक वाॅटरचा फटका

ते म्हणाले गडचीरोली जिल्ह्यात जी विकास कामं होत आहेत, त्या विकास कामांना नक्षलवाद्यांचा विरोध आहे. बंदूकीच्या जोरावर लोकांना एकत्र करुन आंदोलन (aandolan) केलं जातेय. तोडगट्टा गाव, नक्षलवाद्यांचा स्ट्रॅांग होल्ड असलेल्या या एन्ट्री पॅाईंटवर आंदोलन आहे. त्या भागात पोलीस वर्दळ वाढेल. म्हणून नक्षलवादी विकास कामांना विरोध करत आहे असंदी संदीप पाटील यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com