Khed Rain News : कोकणात विशेषत: रत्नागिरी आणि चिपळूण येथे पावसाने थैमान घातलं आहे. परिणामी प्रशासनाने तात्काळ ठाेस पावलं उचलण्यास प्रारंभ केला आहे. चिपळूण शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार (dcm ajit pawar) हे स्वत: रत्नागिरी जिल्हाधिकारी यांच्याशी सातत्याने संपर्कात राहिले आहेत. दरम्यान खेड (water logged in khed near chiplun) शहरावर आलेली आपत्तीजनक स्थिती हे राज्यकर्त्यांचे अपयश असल्याची टीका मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर (mns leader vaibhav khedekar) यांनी केली. (Maharashtra News)
खेड शहरात माेठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने बाजारपेठ बंद अवस्थेत आहे. अनेकांच्या दुकानात पाणी शिरलं आहे. त्यामुळे खेडवासिय चिंतेत पडले आहेत. जगबुडी नदीचा गाळ न काढल्याने खेडवासीयांना पुरजन्य परिस्थितीचा सामना करावा लागत आहे असे मनसे नेते वैभव खेडेकर यांनी नमूद केले.
साम टीव्हीशी बाेलताना खेडेकर म्हणाले दरवर्षी जगबुडी नदीला पूर येतो. यामध्ये व्यापाऱ्यांचं आणि नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. मात्र राज्यकर्त्याच्या नाकर्तेपणामुळे इथला गाळ काढला जात नाही. वशिष्ठी नदीचा, सावित्री नदीचा गाळ निघू शकताे परंतु जगबुडी नदीचा गाळ निघू शकत नाही हेच राज्यकर्त्यांचे अपयश असल्याचे खेडेकर यांनी नमूद केले.
मनसे प्रमुख राज ठाकरे (raj thackeray) यांच्या मार्गदर्शनानूसार पावसाळ्यानंतर (rain) मनसे जगबुडी नदीमधील गाळ काढेल असे आश्वासन खेडेकर यांनी दिले.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.