MSRTC News : ॲपची निर्मती... प्रवाशांना कळणार बस कुठे आहे, किती वेळात पोहोचणार; जाणून घ्या एका क्लिकवर

Chhatrapati Sambhaji Nagar News : सध्या या ॲपची सेवा केवळ अधिकारी, कर्मचारी यांच्या पुरती मर्यादित ठेवण्यात आली आहे.
MSRTC Bus
MSRTC BusSaam tv

- नवनीत तापडिया

msrtc commuters app news : सर्वसामान्य प्रवाशांना एसटी महामंडळाच्या बसचे लोकेशन घरबसल्या मिळण्यासाठी मदत करणाऱ्या ॲपची (msrtc commuters app) सुविधा लवकरच सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे. यामुळे प्रवाशांना आता रेल्वे प्रमाणेच एसटी बसचे लोकेशन घरबसल्या पाहता येणार आहे. (Maharashtra News)

MSRTC Bus
Kisan Sabha On Fixed Milk Price : किसान सभेच्या आंदाेलनास यश, खरचं दूधाला दर मिळेल? डाॅ. अजित नवले

छत्रपती संभाजी नगर विभागातून सुमारे 550 बसेस विविध मार्गावर धावतात. या सर्व बसेस ना ॲपची सिस्टीम बसवली आहे. ती कार्यान्वित केली आहे. मात्र सध्या या ॲपची सेवा केवळ अधिकारी, कर्मचारी यांच्या पुरती मर्यादित ठेवण्यात आली आहे.

MSRTC Bus
Shri Vitthal Rukimini Mandir : भाविकांनाे ! पंढरीच्या विठुरायाची पाद्यपूजा, तुळशी पूजा बंद; जाणून घ्या कारण

एसटीचे लोकेशन बरोबर मिळते की नाही याची दररोज तपासणी करण्यात येत आहे. यात काही अडचणी आल्यास त्या तंत्रज्ञच्या मदतीने सोडवून ॲप परिपूर्ण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम पूर्ण होताच ही सेवा प्रवाशांसाठी खुली करण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांना आता रेल्वे प्रमाणेच एसटी बसचे लोकेशन घरबसल्या पाहता येणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com