Satara Flood : खबरदारी ! संभाव्य पूरस्थितीला तोंड देण्यासाठी साता-यात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज, जाणून घ्या फाेन नंबर्स

Shambhuraj Desai News : संकट काळात नागरिकांची काेणतीही गैरसाेय हाेऊ नये याची काळजी प्रशासनाने घ्यावी अशी सूचना मंत्री देसाईंनी केली.
satara , Shambhuraj Desai, Satara Rain Updates, Satara Rain
satara , Shambhuraj Desai, Satara Rain Updates, Satara Rainsaam tv
Published On

Satara Disaster Management Control Room : सातारा जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा (Satara Rain Update) असल्याने सर्व शासकीय यंत्रणांनी अत्यंत सतर्क रहावे. ज्या संवेदनशील ठिकाणी लोकांचे तातडीने स्थलांतर करणे आवश्यक आहे अशा ठिकाणी कोणताही धोका न पत्करता तेथील नागरिकांचे तात्काळ स्थलांतर करावे, स्थलांतरीत केलेल्या नागरिकांना अन्न, शुध्द पेयजल, पांघरुण, शौचालय आदी सुविधा उपलब्ध करुन द्यावेत अशा सूचना पालकमंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी जिल्हा प्रशासनास केल्या आहेत. (Maharashtra News)

satara , Shambhuraj Desai, Satara Rain Updates, Satara Rain
Khed Rain Updates : वशिष्ठी, 'सावित्री'चा काढता, जगबुडी नदीचा गाळ का काढला जात नाही ?

जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेला मुसळधार पाऊस व देण्यात आलेला इशारा या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी आज (गुरुवार) दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हा प्रशासनाशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधिक्षक समीर शेख, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसलिदार, गट विकास अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत विभाग, आरोग्य अधिकारी आदी यंत्रणांच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून आढावा घेतला.

satara , Shambhuraj Desai, Satara Rain Updates, Satara Rain
Praniti Shinde News : ते आपल्या रक्तावर राजकारण करुन सत्तेवर येण्याचा प्रयत्न करतील, सावध रहा ! प्रणिती शिंदेंचा माेदींवर घणाघात

पालकमंत्री शंभुराज देसाई म्हणाले, मुसळधार पावसामुळे (rain) अनेक ठिकाणी नद्या, नाले दुथडी भरुन वाहत आहेत, काही ठिकाणी रस्ते खचत आहेत, पूल वाहून जात आहेत, दरडी कोसळत आहेत, या सर्व पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. ज्या संवेदनशील ठिकाणी नागरिकांचे स्थलांतर आवश्यक आहे, अशा ठिकाणी मंगलकार्यालये, मोठी सभागृहे, शाळा, आदी सुरक्षित ठिकाणी नागरिकांचे स्थलांतर करावे.

satara , Shambhuraj Desai, Satara Rain Updates, Satara Rain
Dharmarao Baba Atram : धर्मरावबाबा आत्राम यांना धमकी, पाेलिसांनी नक्षलवाद्यांना दिले ठाेस उत्तर

त्यांना निवारा अन्न, शुध्द पेयजल, अशा सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. नागरिकांनीही प्रशासनाच्या आवाहनाला तात्काळ प्रतिसाद द्यावा, संवेदनशील भागात पोलीसांची गस्त वाढवावी. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रशासकीय अधिकारी- कर्मचाऱ्यांनी नियुक्तीच्या ठिकाणी राहणे बंधनकारक आहे.

लोकांमध्ये भितीचे वातावरण पसरु नये यासाठी प्रशासकीय यंत्रणांची पथके तयार करावीत. या पथकांनी संवेदनशील ठिकाणी भेटी द्याव्यात. दरड कोसळण्याची ठिकाणे असणाऱ्या भागात यंत्रणांनी आवश्यक उपाययोजना तात्काळ कराव्यात, असे निर्देश पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दिले.

satara , Shambhuraj Desai, Satara Rain Updates, Satara Rain
Potholes Issue : मृत्यूच्या दाढेतून प्रवास... मावळात रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता, पीडब्ल्यूडी ठेकेदार पाेसताहेत?

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले, दरडी कोसळण्याच्या दृष्टीने संवेदनशील असणाऱ्या 41 गावांतील लोकांचे त्वरीत स्थलांतर करावे, त्यांना अन्न, शुध्द पेयजल, औषधे, आदी आवश्यक सुविधा, उपलब्ध करुन द्याव्यात. स्थलांतरीत ठिकाणी आवश्यकतेनुसार जनावरांच्या चाऱ्याची तजवीज ठेवावी. स्थलांतरीतांपैकी कोणीही रात्री घरी जावू नये याची बचाव यंत्रणांनी आवश्यक खबरदारी घ्यावी.

satara , Shambhuraj Desai, Satara Rain Updates, Satara Rain
Kalyan-Dombivli Rain News : रायते पूलावर आजही पाणीच पाणी, कल्याण- नगर महामार्गावरील वाहतूक बंद

अन्नाची पाकीटे, कोरडे खाद्यपदार्थ उपलब्ध ठेवावेत. वैद्यकीय पथकांनी लोकांना स्वत: जावून भेटी द्याव्यात व भेटीचा अहवाल सादर करावा. आरोग्य यंत्रणेने जलजन्य आजार, सर्पदंश यावरील आवश्यक पुरेसा औषध पुरवठा उपलब्ध ठेवावा. वादळवारे, पाऊस यासारख्या कारणांनी विद्युत पुरवठा खंडीत झाला असेल तेथील विद्युत प्रवाह विद्युत विभागाने लवकर सुरू करावा. कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी यंत्रणांनी अलर्ट मोडवर काम करावे.

satara , Shambhuraj Desai, Satara Rain Updates, Satara Rain
PSI Success Story : वडिलांचे कष्ट पाहून 'खुशबू' झाली व्यथित... मार्ग दिसला अन् 'बरैय्या' बनली फाैजदार (पाहा व्हिडिओ)

आपत्तीच्या काळात नागरिकांनी घाबरुन न जाता मदतीसाठी (Satara) नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.

नियंत्रण कक्ष

मान्सून कालावधीत सर्व संबंधित विभाग तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे जिल्हास्तरावर जिल्हा नियंत्रण कक्ष 24 x 7 या तत्वावर कार्यान्वित आहे.

फोन नं -02162-232349 आणि 232175.

जिल्हयातील पोलीस विभाग- फोन नं.02162-233833 आणि 231181 मो.नं.-9011181888.

satara , Shambhuraj Desai, Satara Rain Updates, Satara Rain
Satara Rain Updates : पर्यटकांनाे सावधान ! कास तलावाचे पाणी रस्त्यावरून वाहू लागले, कास गाव, बामणाेलीची वाहतुक वळवली; 'या' मार्गाचा वापर करा (पाहा व्हिडिओ)

पाटबंधारे विभाग फोन नं -02162-244681 आणि 244654 आणि 244481.

सार्वजनिक बांधकाम विभाग फोन नं-02162-234989.

आरोग्य विभाग फोन नं- 02162-233025 आणि 238494.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मो.नं-9029168554 इत्यादी विभागांनी त्यांचे स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापित केलेले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com