Solapur News : भाजपच्या खालच्या पातळीच्या राजकारणाला काेणी बळी पडू नकाे. सध्या बहुतांश ठिकाणी भाजप षडयंत्र करीत आहे. आगामी काळात हाेणा-या निवडणुकीत त्यांना काहीही करुन सत्ता काबीज करायची आहे. त्यासाठी ते आपल्या रक्तावर देखील राजकारण करुन सत्तेवर येण्याचा प्रयत्न करीत असे काॅंग्रेस नेत्या आमदार प्रणिती शिंदे (praniti shinde latest marathi news) यांनी भाजपावर साेलापूरात केला.(Maharashtra News)
आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या मोदीजींकडून (narednra modi) आणि भाजपकडून वेगवेगळ्या प्रकारचे दबावतंत्र आमच्यावर आणि आमच्या नेत्यांवर वापरले जातात. 'डेस्परेट टाइम्स कॉल फॉर डिस्परेट मेजर्स' या इंग्रजी म्हणीचा दाखला शिंदेंनी दिला. त्या म्हणाल्या जेव्हा पायाखालची जमीन सरकत जाते जेव्हा तुमच्या बाजूचा ग्राफ खाली येतो. तेव्हा तुम्ही अशा गोष्टींचा वापर करता ज्याचा लोकशाहीमध्ये अंदाजही करू शकत नाही असेही त्यांनी म्हटलं.
राहुलजींच्या विरोधात एवढं मोठं षडयंत्र चालू आहे मात्र, याचा राहुलजींना काहीही फरक पडत नाहीये. राहुलजींच्या तेलंगणाच्या सभेत पाच लाखापेक्षा जास्त लोक जमली होती. तेलंगणा मध्ये आता काँग्रेसचे सरकार येणार आहे. महाराष्ट्रामध्ये एक अतिशय अस्थिर सरकार व्यवस्थितपणे देण्यात भाजप, देवेंद्र फडणवीस, मोदी आणि अमित शहा यांच्या आशीर्वादामुळे यशस्वी झालं आहे असे आमदार शिंदे यांनी नमूद केले.
प्रणिती शिंदे म्हणाल्या इडीच्या भीतीमुळे वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक एकत्र येऊन एक स्थिर सरकार महाराष्ट्रामध्ये दिसून येत नाहीये. सर्वधर्मसमभाव आणि लोकशाही जिवंत आहे .मोदींच्या या गलिच्छ राजकारणाला बळी पडू नका. भाजपची ही जी कीड देशाला लागलेली आहे ती कायमस्वरूपी नष्ट करूयात.
ED ला आम्ही का घाबरु ?
देवेंद्र फडणवीस यांची ही मोडस ऑपरेटी आहे," ईडीच्या माध्यमातून कारवाई करा आणि मग त्यांना आपल्या पक्षात आपली बाजू वाढवण्यासाठी घ्या" मोदीजींच्या विरोधात बोलतो याचा मला अभिमान आहे. कारण आम्ही कोणाला घाबरत नाही आम्ही जनतेसाठी काम करतो. आम्ही काय केलं एवढं की त्यामुळे इडी आमच्या मागे लागेल असेही शिंदेंनी नमूद केले.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.