Hingoli News: हिंगोलीत निजामकालीन तोफ गोळे सापडले, ऐतिहासिक वस्तू पाहण्यासाठी नागरिकांची उडाली झुंबड (पाहा व्हिडिओ)

Tof Gola Found In Hingoli: निजामाची राजवटीतील दारूगोळा ठेवण्यासाठीचा हाेता हा तोफखाना.
Hingoli, nizam era cannonballs
Hingoli, nizam era cannonballssaam tv
Published On

Hingoli News : हिंगोली शहरात महिला रुग्णालयाचे (hingoli womens hospital) खोदकाम सुरू असताना निजामकालीन तोफ गोळ्यांचा साठा आढळून आला आहे. हिंगोली शहरातील तोफखाना परिसरात हा साठा आढळला आहे. (Maharashtra News)

Hingoli, nizam era cannonballs
Saam Impact : चिमुकल्या गणेश माळीच्या संघर्षाची कहाणी पाहून डाेळे पाणावले, जिद्दीला मुख्यमंत्र्यांकडून सलाम

कंत्राटदारा मार्फत जेसीबीने या रुग्णालयाचे खोदकाम सुरू असताना हा साठा सापडल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. या संदर्भात महसूल प्रशासनाला लेखी पत्र पाठवून हे तोफगोळे ताब्यात घेण्यासाठी कळविण्यात आले आहे.

दरम्यान (hingoli) शेकडोंच्या संख्येने सापडलेले हे तोफगोळे सन 1724 ते 1948 या काळातील असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र पुरातत्त्व विभागाच्या अहवालानंतरच या बाबत इंत्यूभूत मिळणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Hingoli, nizam era cannonballs
Tulja Bhavani Mandir : भाविकांनाे तुळजाभवानी अभिषेक पुजेच्या शुल्कात माेठी वाढ, साेमवारपासून अंमलबजावणी; पुजा-यांचा विराेध

दरम्यान यामध्ये तीन प्रकारचे तोफ गोळे आढळून आले आहेत. या ऐतिहासिक वस्तू पाहण्यासाठी हिंगाेलीकरांची माेठी गर्दी होत आहे. यामध्ये पाच किलो ते पंधरा किलो वजनांच्या तोफ गोळ्यांचा समावेश आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com