- अभिजित देशमुख
Kalyan Dombivli News : गेले तीन दिवसांपासून कल्याण डोंबिवलीसह आजूबाजूच्या ग्रामीण भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. जोरदार पावसामुळे काळु नदी, उल्हास नदी दुथडी भरून वाहू लागली. याचा फटका कल्याण नगर महामार्गाला बसला आहे.(Maharashtra News)
पावसामुळे (rain) कल्याण नगर महामार्गांवरील रायते पुलावर (rayate bridge kalyan) नदीचे पाणी बुधवारी माेठ्या प्रमाणात आले. पुलावर पाणी येण्यास सुरुवात झाल्याने दुपारच्या सुमारास कल्याण नगर महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. तसेच कल्याण नगर महामार्गावरील पांजरपोळ गावाजवळील रस्त्यावर पाणी मोठ्या प्रमाणात आल्याने वाहतूक कोंडी झाली.
आज (गुरुवार) सकाळी रायते पुलावरील पाणी काही अंशी ओसरले असलं तरी पाऊस सातत्याने सुरू असल्याने आजही हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी वाहन पूलावरुन नेऊ नयेत असे आवाहन करण्यात आले आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.