Sangli Rain Updates : सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी व मदत कार्य राबविण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) एक पथक सांगली जिल्ह्यात दाखल झाले आहे. दरम्यान अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील पाच तालुक्यातील शाळा व महाविद्यालयांना प्रशासनाने आज (गुरुवार) सुट्टी जाहीर केली आहे. (Maharashtra News)
सांगलीत आलेल्या एनडीआरएफच्या पथकामध्ये पथक प्रमुख राजेश येवले व मोहित शर्मा असे दोन अधिकारी व इतर २० जवानांचा यामध्ये समावेश आहे. या पथकाकडे बोट, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग, रोप, इमारत कोसळल्यानंतर शोध व सुटका कामी आवश्यक साहित्य सामग्री उपलब्ध आहे.
सन २०१९ आणि २०२१ मधील जुलै महिन्याच्या शेवटी पडणारा पाऊस व हवामान खात्याकडील अंदाज पाहता त्यानुसार राज्य शासनाकडून एनडीआरएफच्या पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
हे पथक ३१ ऑगस्टपर्यंत सांगली जिल्ह्यात कार्यरत राहणार आहे. या पथकामार्फत जिल्ह्यामधील संभाव्य पूर प्रवण भागातील क्षेत्र, शहरी भागातील धोकादायक इमारती, दरडग्रस्त गावाची पाहणी, धोकादायक औद्योगिक क्षेत्र इत्यादी पाहणी करण्यात येणार आहे. तसेच आपत्तीच्या काळात काय करावे व काय करू नये या अनुषंगाने जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे एनडीआरएफच्या पथकातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
सातारा शहरात आजही (गुरुवार) पावसाची (rain) संततधार सुरु आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनूसार आजही सातारा जिल्ह्याला अतिवृष्टीचा (ऑरेज अलर्ट) इशारा असल्याने जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील पश्चिमेकडील तालुके (पाटण, महाबळेश्वर, जावली, वाई आणि सातारा) मधील सर्व माध्यमांच्या शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.