Potholes Issue : मृत्यूच्या दाढेतून प्रवास... मावळात रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता, पीडब्ल्यूडी ठेकेदार पाेसताहेत?

maval potholes news : शासकीय अधिकाऱ्यांनी खड्डे पडलेल्या ठिकाणी डागडुजी चालू असल्याचे साम टीव्हीशी बाेलताना सांगितले.
Maval
Maval saam tv
Published On

Maval News : मावळ तालुक्‍यात सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत असलेल्या रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. तर तळेगाव चाकण राष्ट्रीय महामार्ग देखील याला अपवाद नाही. या महामार्गाची मोठ्या प्रमाणात दूरवस्था झाली आहे. वाहन चालक व ग्रामस्थांना खड्डेमय रस्त्यावरून चालताना कसरत करावी लागत असून, दैनंदिन किरकोळ व गंभीर अपघात होत आहेत. (Maharashtra News)

Maval
Amravati News : झोपडपट्टी परिसरातील अनिरुद्धची शिक्षणाची आस, ब्रिटिश सरकारची दीड कोटीची फेलोशिप

रस्ते म्हणजे देशाच्या रक्‍तवाहिन्या असून मावळ तालुक्‍यातील केवळ एक्सप्रेस वे व जुना मुंबई-पुणे महामार्ग (old mumbai pune expressway) सोडून तालुक्‍यातील ग्रामीण परिसराला जोडणारे रस्ते खड्डेमय व धोकादायक झाले आहेत. रस्त्यांची चाळण झाली आहे. अनेक ठिकाणी पावसाळ्यात जागोजागी रस्त्याचा भाग वाहून गेला आहे. तर काही ठिकाणी रस्ते खोदल्याने या खड्ड्यात पाणी साठले आहे.

Maval
Nagar News : महिला, मुलींच्या सुरक्षिततेसाठी वेळप्रसंगी कायदा हातात घेऊ : भाजपच्या माजी मंत्र्यांचा पोलिसांना इशारा

त्यामुळे वाहन चालक व ग्रामस्थांना या रस्त्यावरून ये-जा करताना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत आहे. तालुक्याचे गाव वडगाव मावळात खड्यांची चाळण झाली आहे. रस्त्यावर नागरिकांना चालताही येत नाही. या खड्डेमय व धोकादायक रस्त्यावर दैनंदिन विद्यार्थी, कामगार, दुग्ध व्यावसायिक, शेतकरी व नागरिकांच्या दुचाकी घसरून अपघात होत आहे.

Maval
Sambhaji Brigade News : संभाजी भिडेंच्या आजच्या व्याख्यानास विराेध, संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते पाेलिसांच्या ताब्यात

मावळ (maval) तालुक्‍यातील रस्त्यावर अवजड वाहतूक होत असल्यामुळे रस्त्यांची दिवसेंदिवस दूरवस्था होत असून वाहन चालक व ग्रामस्थांना मृत्यूच्या दाढेतून प्रवास करावा लागत आहे. या रस्त्यामुळे अनेक वेळा वाहने पंक्‍चर होत असून खड्डेमय रस्त्यामुळे दुचाकीस्वारांना मणक्‍याचे आजार बळावत आहेत.

Maval
Flood Hits Gadchiroli : पावसाचा हाहाकार... दक्षिण गडचिरोली चंद्रपूरचा संपर्क तुटला

या रस्त्यावर मोठ्या आकाराचे खड्डे पडले दिसत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग केवळ ठेकेदार पोसण्याचे काम करत असून अनेक रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याने शासनाचा निधी खड्ड्यात गेला आहे. तालुक्‍यातील रस्त्यांचे सर्वेक्षण करून ज्या ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाचे कामे केली आहे. त्यांची नावे काळ्या यादी टाकावीत अशी मागणी देखील नागरिकांकडून होत आहे.

या ठिकाणी होणाऱ्या अपघातांना सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार राहणार का असा प्रश्‍न देखील नागरिकांकडून उपस्थित होत आहे. दरम्यान याबाबत मात्र शासकीय अधिकाऱ्यांनी खड्डे (potholes) पडलेल्या ठिकाणी डागडुजी चालू असल्याचे सांगितले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com