Beed Dhananjau Saam Tv
महाराष्ट्र

Santosh Deshmukh Case: वाल्याला फाशी झालीच पाहिजे, आक्रमक ग्रामस्थांच्या घोषणा; देशमुख कुटुंबीयांचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

मस्साजोगेचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी धनंजय देशमुखांसह ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले आहे. गावकरी पाण्याच्या टाकीवर चढले असून ते जोरदार घोषणा करत आहेत.

Priya More

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केले आहे. मस्साजोगमधील ग्रामस्थ देखील दुसऱ्या पाण्याच्या टाकीवर चढले असून आरोपींना फाशी द्या अशी घोषणाबाजी करत आहेत. संतोष देशमुखांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. घटनास्थळी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे देखील आले आहेत.

मस्साजोग गावातील ग्रामस्थांनी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केले आहे. धनंजय देशमुख हे देखील पाण्याच्या टाकीवर चढले आहेत. आंदोलनावेळी धनंजय देशमुख यांना अश्रू अनावर झाले. धनंजय देशमुख यांच्यासह पाण्याच्या टाकीवर ३ जण चढले आहेत. तर गावातील इतर तरुण हे दुसऱ्या पाण्याच्या टाकीवर चढले आहेत. धनंजय देशमुख त्यांचे साडू दादा खिंडकर आणि अन्य काही नातेवाईक या आंदोलनात सहभागी झाले आहेत. यावेळी धनंजय देशमुख यांना भोवळ आली.

मस्साजोग गावातील दोन पाण्याच्या टाकीवर चढून ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले आहे. धनंजय देशमुख हे सकाळी अचानक गावातून बाहेर पडले होते. त्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केले. आता या आंदोलनात महिला देखील सहभागी झाल्या आहेत. त्यांनी पाण्याच्या टाकीखाली बसून आंदोलन सुरू केले आहे. आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि संतोष देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

आंदोलनकर्त्या महिलांनी आरोपीला फाशी द्या असी मागणी केली आहे. जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करणार आहोत. आमचं पूर्ण गाव गेलं तरी चालेल आम्ही आरोपीला शिक्षा देत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. वाल्मिक कराडविरोधात मोक्का लावा आणि त्याला फाशी द्या अशी मागणी महिलांनी केली आहे. खंडणी प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला का सोडताय? त्याच्याविरोधात ३०२ चा गु्न्हा दाखल करून त्याला फाशी द्या अशी मागणी महिला आंदोलकांनी केल्या आहेत.

मनोज जरांगे पाटील हे आंदोलनस्थळी पोहचले आहेत. त्यांनी आम्ही देशमुख कुटुंबीयांच्या पाठिशी आहोत असे सांगितले. असं खचून चालणार नाही. आम्ही देशमुख कुटुंबीयांच्यासोबत आहोत. धनंजय देशमुखांनी पाण्याच्या टाकीवरून खाली यावे असे आवाहन जरांगेंनी केले. आंदोलन स्थळी पोलिस दाखल झाले आहेत. पोलिसांनी आंदोलकांना खाली उतरण्यास सांगितले. अतिरिक्त पोलिस अधिक्षक चेतना तिकडे देखील घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. पोलिसांकडून धनंजय देशमुखांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gateway Of India: गेटवे ऑफ इंडियाचा इतिहास आणि खास 10 मनोरंजक तथ्ये

Maharashtra Live News Update: उद्या दुपारी होणार राज्य मंत्रिमंडळाची बैठक

Pune Crime: दुचाकीवरून ताम्हिणी घाटात गेले, दारू पिण्यावरून वाद; तरुणाने सख्ख्या भावाची केली हत्या

Karisma Kapoor: ३० हजार कोटींसाठी वाद! करिश्मा कपूरला एक्स पतीच्या मालमत्तेतचा किती हिस्सा मिळणार?

Green Bangles Design: श्रावणात महिलांनी हातात घाला हिरव्या बांगड्या, सौंदर्य येईल खुलून

SCROLL FOR NEXT