Santosh Deshmukh Case: मारहाणीचा बदला आणि ग्रुप व्हिडिओ कॉल; सरपंच हत्या प्रकरणी चौकशीत धक्कादायक माहिती आली समोर

Santosh Deshmukh Case Updates: आरोपींपैकी एकाने मोकारपंथी या व्हॉटसअप ग्रुपवर व्हिडिओ कॉल करून मारहाणीचा व्हिडिओ दाखवला होता. हा व्हिडिओ १६ ते १९ वयाच्या मुलांनी पाहिलाय.
Santosh Deshmukh Case
Santosh Deshmukh Case UpdatesSaam Tv
Published On

विनोद जिरे, साम प्रतिनिधी

बीडमधील मस्साजोग येथील माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत. या हत्या प्रकरणात पोलीस चौकशीत आता मोठा एक खुलासा झालाय. देशमुख यांची हत्या बदला घेण्याच्या भावनेतून झाल्याची माहिती पोलिसांच्या सुत्रांनी दिलीय. दरम्यान देशमुख यांच्या हत्येतील सर्व आरोपींना मोक्का लावण्यात आलाय. त्याचदरम्यान या पोलीस चौकशीतून हा नवा खुलासा झालाय.

डिसेंबर ९ रोजी सरपंच देशमुख यांचे अपहरण झालं आणि त्यानंतर त्यांची हत्या झाली. या प्रकरणाने बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी जग साऱ्या राज्यासमोर आले आहे. देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक झालीय, त्यांना मोक्का लावण्यात आलाय. याचदरम्यान हत्येचं नवं कारण पोलीस तपासातून बाहेर आले आहे. सरपंच देशमुख यांची हत्या ही मारहाणीचा बदला घेण्यासाठी झाल्याची बाब पोलीस चौकशीतून बाहेर आलीय.

Santosh Deshmukh Case
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणात ७ आरोपींवर मकोका, वाल्मिक कराड हत्या प्रकरणातील आरोपी नाही

बीड मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण झाली तेव्हा त्याचा व्हिडिओ बनवण्यात आला. तसेच एका व्हॉट्स अॅप ग्रुपवर व्हिडिओ कॉल करत मारहाण दाखवण्यात आली. हा व्हिडिओ कॉल मोकारपंथी नावाच्या व्हॉटस् अप ग्रुपला करण्यात आला होता. मारहाण करणाऱ्यांपैकी एका आरोपीने व्हिडीओ कॉल केला होता. हा कॉल 16 ते 19 वर्ष वयोगटातील चार ते पाच जणांनी पाहिल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.

Santosh Deshmukh Case
Pankaja Munde:'सुरेश धसांनी बीडला बदनाम केलंय', संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून पंकजा मुंडे यांचा घणाघात

संतोष देशमुख यांना गॅसचा पाईप तसेच लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली होती. पोलिसांनी मारहाणीसाठी वापरण्यात आलेली साहित आरोपींकडून जप्त केली आहेत.

मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल

डिसेंबर ६ रोजी अवादा एनजी कंपनीच्या आवारात सुदर्शन घुले यांच्यासह इतरांनी सुरक्षा सुरक्षा रक्षकाला मारहाण केली होती. त्यावेळी सरपंच देशमुख यांनी सुरक्षा रक्षकाला मारहाणीतून सोडवलं होतं. त्यावेळी आरोपी आणि सरपंच यांचा वाद वाढला. मात्र त्यावेळी सुदर्शन घुले याच्यासह इतरांना त्या ठिकाणी मारहाण झाली होती. याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

Santosh Deshmukh Case
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, मानवाधिकार आयोगामध्ये गुन्हा दाखल

मारहाणीत सरपंच देशमुख यांचा मृत्यू

आपल्याला मारहाण झाल्याचा राग मनात ठेवून सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांनी संतोष देशमुख यांचे ९ डिसेंबर रोजी अपहरण केले. त्यासाठी आरोपी सिद्धार्थ सोनवणे याने देशमुख यांचे लोकेशन दिले. अपरहण केल्यानंतर आरोपींना देशमुख यांना गॅस पाईप व लोखंडी रॉडने मारहाण केली. आरोपींपैकी एकाने मोकारपंथी या व्हॉटस अप ग्रुपवर व्हिडिओ कॉल करुन मारहाणीचा व्हिडिओ दाखवला. हा व्हिडिओ 16 ते 19 वर्ष वयाच्या चार ते पाच जणांनी पाहिला. दरम्यान या मारहाणीत संतोष देशमुख यांचा जागीच मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com