Sanjay Raut Saam tv
महाराष्ट्र

Sanjay Raut: हे ऑपरेशन लोटस नाही, ऑपरेशन डर...; संजय राऊतांचा थेट महायुतीला टोला

Sanjay Raut Allegation On Mahayuti: काल देवेंद्र फडणवीस आणि गौतम अडानी यांची भेट झाली. या भेटीवर संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा महायुतीवर निशाना साधला आहे. महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस राबवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला आहे.

एकनाथ शिंदे आणि अजित पवार पळाले ते ऑपरेशन नव्हतं तर ऑपरेशन डर होतं, असं म्हणत संजय राऊतांनी निशाणा साधला आहे. त्यांच्याकडे पैसे आहेत, त्यांच्याकडे यंत्रणा आहेत. ते दहशत निर्माण करु शकतात. याआधी अशी माणसं कधीच फुटली नव्हती. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसारखी माणसे का गेला पळून? ते भीतीमुळे पळून गेले.हे ऑपरेशन लोटस नाही, ऑपरेशन डर आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत यांनी संसद अधिवेशनावरही भाष्य केले आहे. त्यांनी म्हटलं की,सत्ताधारी सभागृह चालू देत नाही हे फार आश्चर्यकारक आहे. सभागृह चालू देण्याची जबाबदारी सत्ताधारी पक्षाची असते.

गौतम अडानी विषय हा कोणाचं व्यक्तिगत विषय नाही.अमेरिकेच्या न्यायालयाच्या नुसार आम्ही अडानी मुद्यावर बोलायला उभे राहिलो तर आम्हाला बोलू देत नाहीत.आता जॉर्ज सोरेस वर सभागृह चालू देत नाहीत.भारताच्या इतिहासात अशा घटना कधी घडल्या नाहीत.विरोधी पक्षाची अवहेलना करायची ही कुठली लोकशाही आहे? राज्यसभा सभापती पक्षपातीपना करत आहेत. आमच्याकडे अविश्वास ठराव मांडण्याशिवाय पर्याय नव्हता, असं त्यांनी म्हटलं आहे. (Sanjay Raut)

उद्योगपती गौतम अदानी यांनी देवेंद्र फडणवीस यांची काल भेट घेतली. त्यांच्यात दीड तास चर्चा झाली.संपूर्ण महाराष्ट्र अडानींच्या घशात घालायचा आहे. यांची लायकी बघा यांनी जकात नाके चालवायचे आहे. विमानतळ, जकात नाके, भाजी दुकान हे सर्व अडानी चालवत आहे. आता आम्ही आवाज उठवायचा नाही का? काल अडानी फडणवीस यांना भेटले तेव्हाच लक्षात आले. (Sanjay Raut On Operation Lotus)

संजय राऊत यांनी मंत्रिमंडळाच्या विस्तारावर प्रतिक्रिया दिली आहे.मला फॉर्म्युला माहीत नाही तो त्यांचा विषय आहे. २० दिवसांनी देखील गृहमंत्री मिळत नाही. तर राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो, असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान बीडमध्ये झालेल्या हत्येवरदेखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बीड मध्ये दिवसा ढवळ्या सरपंचाची हत्या केली.भाजप आमदाराच्या मामाचं अपहरण करून हत्या होते हे काय सुरू आहे राज्यात. मी बजरंग सोनवणे यांचं वक्तव्य ऐकलं. खासदार फोन करून देखील SP फोन उचलत नाहीत ही गंभीर बाब आहे.आम्हाला गोळ्या झाडाल, आमची हत्या कराल... करा, अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला आहे. (Sanjay Raut on Beed Crime)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT