

लाँग मार्चचा दुसरा टप्पा पूर्ण झाला
राजूर ते अहिल्यानगर लाँग मार्च...
लाँग मार्च संगमनेर शहरात पोहचला...
148 किमी पैकी 50 किमीचा प्रवास पूर्ण
संगमनेर प्रांताधिकारी कार्यालयावर आजचा मुक्काम..
अकोलेहून निघालेला मोर्चा आज संगमनेर शहरात मुक्कामी.
कोल्हापूर जिल्ह्यातील हनिमनाळ येथे राज्यातील सर्वात अनोखी यात्रा पार पडली. श्री महारुद्र बलभीम देवाची ही यात्रा नुकतीच पार झाली. या यात्रेतील श्रीफळ सोहळा पार पडला. अशा पद्धतीचा श्रीफळ सोहळा राज्यातल्या कोणत्याच यात्रेमध्ये पार पडत नसेल. बलभीम देवाला नवस बोलल्यानंतर ते फेडण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने आकाशात नारळ फेकतात. बलभीम देवाच्या परिसरात हजारो नारळाचा खच पाहायला मिळतो. गावातील तरुण नारळ आकाशात भिरकावतात. तर काही तरुण ते झेलण्याचा प्रयत्न करत असतात..
साताऱ्यात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. शहरातल्या गजबजलेल्या करंजे पेठ नाका परिसरात 'कोयता गॅंग'ने भरदिवसा धुमाकूळ घातला असून एका गॅरेज मधील तरुणावर अज्ञात हल्ले खोराने धारदार कोयत्याने प्राणघातक हल्ला केला आहे. अक्षय रामदास गाडे हा तरुण यामध्ये गंभीर जखमी झाला असून हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. यातील एका हल्लेखोराला जखमी अक्षय गाडे याने दुकानातच डांबून ठेवल्यामुळे त्या आरोपीला शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी येऊन ताब्यात घेतले.
रे रोड परिसरात हत्येच्या प्रयत्नाची धक्कादायक घटना
आरोपी रंजीत कमराज (व्यवसायाने ड्रगिस्ट) याने केला हल्ला
शिवकुमार कुप्पुस्वामी यांच्यावर लोखंडी रॉडने डोक्यावर वार
शिवकुमार हे क्रेन ऑपरेटर म्हणून रोजंदारीवर काम करतात
घटनेवेळी ते नेहमीप्रमाणे काम करत होते.
हल्ल्यात डोक्याला गंभीर दुखापत, मोठ्या प्रमाणात रक्तस्राव
चंद्रपूर जिल्ह्यातील लोहार डोंगरी इथे प्रस्तावित लोह खाणीचा विषय आज विधानसभेत चर्चेला आला. काँग्रेसचे आमदार नितीन राऊत आणि शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला. केवळ 32 नोकऱ्यांसाठी लाखो झाडांची कत्तल होणार असेल आणि वाघांचा मार्ग बंद केला जात असेल, तर अशा प्रकल्पाची गरज काय, असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात लोहारडोंगरी या आदिवासीबहुल गावाजवळ किर्र जंगलात लोह खनिजाचा साठा आहे. त्याचे उत्खनन करण्यासाठी शासनाने राज्य वन्यजीव अभ्यास मंडळाकडे हा विषय सोपवला. या मंडळाने शासनाच्या बाजूने कल दिला आणि त्यानंतर तो केंद्राच्या राष्ट्रीय वन्यजीव प्राधिकरणाकडे पाठवण्यात आला.
विक्रोळी पश्चिमेतील एलबीएस मार्गावर आज सायंकाळी रस्त्यावरून जात असलेल्या एका चारचाकी वाहनाला अचानक भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असले तरी वाहन पूर्णपणे जळून खाक झाले आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
धुळे तालुक्यातील बोरीस परिसरातील लोणखेडी फाट्याजवळ आज भरदुपारी चारचाकी आणि दुचाकीचा अपघात झाला असून, या घटनेमध्ये दोन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत, स्थानिकांनी तात्काळ प्रसंगावधान दाखवत जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे, यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
बोरीसकडून जाणारे एक चारचाकी वाहन आणि जैताण्याहून बोरीसच्या दिशेने येणारी दुचाकी यांच्यात ही धडक झाली, या अपघातात दुचाकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, दुचाकीवरील दोन जण जखमी झाले, भरदुपारी ही घटना घडल्याने सुरुवातीला काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र परिसरातील नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जपत तत्परता दाखवली, आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोन्ही जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
अहिल्यानगर शहरातल्या जुना मंगळवार बाजार परिसरातील होशिंग हॉस्पिटलजवळ प दोन वर्षाच्या चिमुकलीवर भटक्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात चेहऱ्यावर गंभीर जखम झाली आहे.सिद्रा इसरार शेख असे जखमी चिमुकलीचे नाव आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा गावाजवळ कार आणि मालवाहू ट्रकचा अपघात झाला आहे. अपघातात श्रीरामपूर येथील पाच जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या तिजोरीच्या चाव्या कुणाच्या हातात जाणार हे आज स्पष्ट झालं. स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेला आज सुरुवात झाली. अध्यक्षपदासाठी भाजपकडून अभिषेक बारणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरात जुन्या पुणे नाशिक महामार्गावर असणाऱ्या महेश खवा केंद्राला भीषण आग लागली असून आग बी झाविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या खवा केंद्रापासून जवळच चिंग पंप असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून राजगुरूनगर नगर परिषदेचे अग्नीशमन पथक घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्याचा प्रयत्न सुरू आहे
यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत, राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर निता ठाकरे, एयर मार्शल यल्ला उमेश, मेजर जनरल एन एस सोहल, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल, जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी त्यांचे स्वागत केले
पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेतील पात्र लाभार्थ्यांचा मुद्दा मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे यांनी विधिमंडळात उपस्थित केला
पीएम किसान सन्मान निधी योजनेची यादी राज शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी वापरली जाते. केंद्राच्या यादीतील त्रुटी मुळे अनेक पात्र शेतकरी राज्य शासनाच्या योजनेपासून वंचित राहत आहेत. एकच वेळी दोन्ही योजनांचा लाभ न मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळण्यासाठी आमदार अवताडे यांनी विधानसभा गृहात प्रश्न उपस्थित केला.
- जामठा येथील विश्वशांती सरोवर येथे कार्यक्रमाचे उद्घाटन सोहळा 6 वाजता होणार...
- विश्वास, सौहार्दता आणि मानवतेचा संदेश अभियानाचा उद्देश समाजमूल्यांची जपणूक
- राज्यपाल आचार्य देवव्रत आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेही राहणार उपस्थित....
- ब्रह्मकुमारी बी.के. मृत्युंजय भाई, बी.के. चंद्रिका उपस्थित नागपूरच्या बी.के. रजनी यांचीही उपस्थिती
लाखोंचा मुद्देमाल जप्त, वणी शहराच्या लगतच असलेल्या लालगुडा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाड
धाडीत बनावटी दारू तयार करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश,हा कारखाना एका आलिशान दुमजली घरात सुरू होता
बनावटी दारूच्या 36 पेट्या, दारूच्या रिकाम्या बाटल्या, झाकणे, स्पिरिट चे खाली ड्रम, तीन दुचाकी, तसेच इतर साहित्य असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त
सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे काँग्रेस भवनसमोर आंदोलन
“नरेंद्र सरेंडर” अशी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी
नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर देशहिताशी तडजोड केल्याचा आरोप
मालवण तालुक्यातील वायंगणी येथून बेपत्ता असलेल्या एका २८ वर्षीय विवाहितेचा मृतदेह हडी कालावल पुलाजवळ खाडीकिनारी झाडाच्या वेलीला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. अंतरा हर्षद दुखंडे असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
बोईसर मधील विनायक केमिक्स कंपनीत क्लोरिंग गॅसची गळती. काही कामगारांना श्वसनाचे आणि घशाचे त्रास जाणवू लागल्याने प्रकार उघडकीस.अग्निशमन दल घटनास्थळी दाखल .
मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदौर-पुणे या राज्य महामार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून वाहतूक तासनतास खोळंबत असल्याने स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीच्या समश्येला तोंड द्यावे लागत असते.
त्यातच अवजड वाहतुकीमुळे अनेक अपघात हे नित्याचे झाल्याने वाहतूक कोंडीतून मनमाडच्या नागरिकांची सुटका व्हावी या साठी रिपब्लिकन पार्टी आठवले गटाने रेल्वे उड्डाण पुलाजवळ रास्ता रोको आंदोलन केले.
येरवडा कारागृहातील कैद्यांकडे सापडला मोबाईल,सिमकार्ड,पॉवर बँक,चार्जर आणि वायर
कारागृहात थेट मोबाईल आणि इतर वस्तू आढळल्याने खळबळ.
नौशाद बद्रुद्दीन शेख आणि अज्ञात इसमाने मोबाईल वापरल्याने खळबळ..
कारागृहातील कैद्याने मोबाईल वापरून कोणाला लावले फोन.
पुण्याच्या येरवडा कारागृहात फोनचा वापर
फोनचा वापर केल्याप्रकरणी येरवडा पोलिसात आरोपी विरोधात गुन्हा दाखल
याप्रकरणी येरवडा पोलिस अधिक तपास करत आहेत.
मुंबई -
- 40 पेक्षा अधिक गुन्ह्यांतील फरार आरोपी अंधेरी पोलिसांच्या जाळ्यात
- सराईत आरोपी वसीम अब्बास मिर्झा उर्फ वसीम जाफर शेख (वय ३८) याला अंधेरी पोलिसांकडून अटक.
- आरोपीवर जबरी चोरी, सोनसाखळी चोरी व महिलांना लक्ष्य करणारे ४० पेक्षा अधिक गुन्हे विविध पोलीस ठाण्यांत दाखल.
- मंदिर परिसर, बाजारपेठ व गर्दीच्या ठिकाणी महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावणे ही आरोपीची कार्यपद्धती.
- अंधेरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.
- आरोपीकडून चोरीस गेलेल्या सोनसाखळ्यांपैकी काही मुद्देमाल जप्त.
बुलडाणा -
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शेगाव येथील संत गजानन महाराज समाधीचे दर्शन घेतलं
शेगाव संस्थांचे अध्यक्ष निळकंठ पाटील यांनी त्यांचा स्वागत केलं
राष्ट्रपती द्रौपदी मुरमु यांच्यासोबत आचार्य देवव्रत ही होते
श्री संत गजानन महाराज संस्थान राष्ट्रपतींचा स्वागत आपल्या पारंपारिक पद्धतीने केलं
यावेळी राष्ट्रपतींनी श्री संत गजानन महाराज संस्थान च्या सेवाकार्याचाही आढावा घेतला.
पुणे -
स्वारगेट बस डेपो बलात्कार प्रकरण एक वर्ष पूर्ण
आरोपी दत्ता गाडेचा न्यायालयात निर्दोषत्वाचा दावा
शहरातील स्वारगेट एसटी बस डेपोमध्ये २५ फेब्रुवारी २०२५ रोजी घडलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाला आज एक वर्ष पूर्ण झाले.
या प्रकरणातील मुख्य आरोपी दत्तात्रय रामदास गाडेने न्यायालयात स्वतःला निर्दोष घोषित करण्याचा अर्ज केला आहे.
आरोपीने यासोबतच जामीन मिळवण्याची याचिकाही सादर केली असून, अद्याप न्यायालयाने या अर्जांवर अंतिम निर्णय दिलेला नाही. त्यामुळे खटल्याची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.
कल्याण -
कल्याण आधारवाडी वरटेक्स इमारत परिसरातील रस्त्यावरील घटना
कारची चार दुचाकींना धडक, दोन दुचाकीस्वार किरकोळ जखमी
कारचालकाला खडकपाडा पोलिसांनी घेतलं ताब्यात
डोंबिवली स्टेशनवर जीवघेणा थरारक क्षण; लोकल ट्रेन मध्ये असलेल्या गर्दीमुळे चढताना तरुण पडला.
सतर्क प्रवाशांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली
डोंबिवली रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म ५ वरील थरारक दृश्य गणेश अरुण कदम नावाच्या रेल्वे प्रवासाच्या मोबाईलमध्ये कैद
कल्याण–डोंबिवली-ठाणे मार्गावर वाढत्या गर्दीमुळे अपघातांची मालिका सुरूच .. प्रवासाच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर
अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर DGCA च्या विमानांवर उड्डाणाला बंदी घालण्यात आली आहे
तसेच रोहित पवारांनी आज मारिन ड्राइव्ह परिसरात दाखल होत तक्रार दाखल केली आहे.
शहादा डामरखेडा पुलावर मोठी वाहतूक कोंडी...
पुलावर 3 ते 4 किलोमीटर वाहनांच्या रांगा, दीड तासांपासून प्रवाशांचा हाल...
ऐन मुहूर्ताच्या वेळी वऱ्हाडी आणि नागरिक तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकले....
जुना पूल धोकादायक असतानाही नियम धाब्यावर बसवून वाहतूक सुरूच.
नियमांचे उल्लंघन करून अवजड वाहने पुलावर शिरल्याने गोंधळ...
जुन्या पुलाची लोखंडी कमान तोडून अवजड वाहनांचा प्रवास...
नवीन पुलाचे संथ काम आणि प्रशासनाचे दुर्लक्ष नागरिकांच्या जीवावर...
बंदी असूनही रात्रीच्या वेळी लोखंडी कमान तोडून अवजड वाहने जुन्या पुलावरून घुसली. ..
लहान मुले, वृद्ध आणि रुग्णवाहिकाही ट्रॅफिकमध्ये अडकल्याची भीती
नाशिकच्या मालेगाव मधील लोकसंघर्ष समितीचे लुकमान कमाल यांनी त्यांच्या प्रभागात लाईट नसल्या कारणाने वारंवार महानगर पालिकेला निवेदन देऊनही त्याची दखल घेतली जात नव्हती. त्या प्रभागातील नागरिकांनी मनपाच्या विद्युत विभागातच ठिय्या मांडला. आणि रमजानचा महिना असल्याने सायंकाळची नमाजाची वेळ झाल्याने विद्युत विभागाच्या कार्यालयातच या नागरिकांनी नमाज पठण केले. मालेगाव शहरता हा चांगलाच चर्चेचा हा विषय बनला असून त्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे...
बुलढाणा जिल्ह्यातील श्री संत गजानन महाराज मंदिर येथून महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचा ताफा बाहेर पडत असताना एक अनपेक्षित घटना घडली. राष्ट्रपतींच्या कारसमोर अचानक एक कुत्रा आल्याने काही क्षण तणावाचे वातावरण निर्माण झाले.
मंदिर परिसरात आणि ताफ्याच्या मार्गावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, ताफा पुढे सरकत असतानाच एक कुत्रा सुरक्षाव्यवस्थेला छेद देत थेट वाहनांच्या मधोमध शिरला. नेमके राष्ट्रपतींच्या वाहनासमोरच तो आल्याने पोलिसांची एकच धावपळ उडाली.
तत्काळ सतर्क झालेल्या सुरक्षा यंत्रणांनी परिस्थिती नियंत्रणात आणत कुत्र्याला बाजूला हटवले आणि ताफा सुरक्षितपणे पुढे रवाना झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही दुर्घटना घडली नाही.
या प्रकारामुळे काही क्षण गोंधळ निर्माण झाला असला तरी सुरक्षा यंत्रणेने त्वरित प्रतिसाद देत परिस्थिती सुरळीत केली. मात्र, एवढ्या तगड्या बंदोबस्तातही असा प्रकार घडल्याने सुरक्षा व्यवस्थेबाबत चर्चा रंगू लागली आहे.
ऐतिहासिक क्षण! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचे संत गजानन महाराज मंदिरात दर्शन
बुलढाणा जिल्ह्यासाठी अभिमानाचा आणि ऐतिहासिक असा क्षण आज अनुभवायला मिळाला. इतिहासात प्रथमच देशाच्या राष्ट्रपतींनी श्री संत गजानन महाराज मंदिर येथे भेट देत दर्शन घेतले.
महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु या आज शेगाव येथे दाखल झाल्या. मंदिरात आगमन होताच त्यांचे संस्थानच्या वतीने विधिवत स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी संत गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले व पारंपरिक पद्धतीने पूजा-अर्चा केली.
राष्ट्रपतींच्या हस्ते मंदिरात आरतीही करण्यात आली. या प्रसंगी मंदिर परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. स्थानिक प्रशासन, पोलीस विभाग तसेच मंदिर संस्थानचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रपतींच्या या भेटीमुळे शेगाव नगरीचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व अधिक अधोरेखित झाले असून, भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल असा हा क्षण मानला जात आहे.
अहिल्यानगर शहरावर पाणी संकट
महापालिकेकडे १३.४० कोटींची थकबाकी मुळा पाटबंधारे विभागाची मनपा प्रशासनाला अंतिम नोटीस
महापालिकेने गेल्या सन २०२५-२६ या वर्षात कोणतीही रक्कम मुळा पाटबंधारे विभागाकडे अदा केलेली नाही त्यामुळे मुळा पाटबंधारे विभागाने उचलली कडक पावले
अनेक वेळा सूचना देऊनही महापालिकेने दखल घेतली नाही त्यामुळे आता मुळा पाटबंधारे विभागाने करारनाम्यातील अटी व शर्तीनुसार थकीत रक्कम न भरल्यास कोणत्याही क्षणी पाणीपुरवठा खंडित केला जाईल असा नोटीस द्वारे दिला अंतिम इशारा
स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीतून राष्ट्रवादी ( AP ) घेणार माघार
तर स्थायी समिती सभापती निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेची तटस्थ भूमिका
भाजपच्या स्थायी समिती सभापती पदाचा मार्ग मोकळा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिस्त पालन समितीचे अध्यक्ष व शरद पवारांचे निकटवर्तीय असलेल्या
माजी मंत्री व राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकरांचे सुपुत्र भाजपच्या गळाला
600 कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन आज भाजपमध्ये प्रवेश करणार
थोड्याच वेळात वसमत वरून पक्षप्रवेशाच्या सोहळ्यासाठी मुंबईला रवाना
नाशिकच्या चांदवड-निफाड रस्त्यावर काल दुपारच्या सुमारास शाळेत मुलांना घेण्यासाठी जात असलेल्या 29 वर्षीय महिलेला ऐका कार चालकाने उडवल्याची घटना घडली होती,याच रस्त्यावर एक वाईन शॉप असून त्याठिकाणी आलेले ग्राहक गाड्या लावून दुकानात जातात,प्रसंगी तेथेच मद्य सेवन करत असल्याने यापूर्वी अपघाताच्या घटना घडल्या मात्र कालच्या घटनेमुळे या भागात राहणाऱ्या नागरिकांचा संतापाचा बांध फुटल्याने शाळकरी विद्यार्थी,महिला,पुरुष यांनी या रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले असून,वाईन शॉप हलवण्याची मागणी करण्यात आली आहे.
कल्याण येथील कोळीवाड्यामध्ये अनेक वर्षांची परंपरा जपणारा शिमगा उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. होळीच्या आठ दिवस आधी साजरा होणारा हा पारंपरिक उत्सव कोळी बांधवांसाठी विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वाचा मानला जातो.
शिमगा उत्सवाच्या निमित्ताने सकाळपासूनच कोळीवाड्यात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. परंपरेनुसार होळीचा खांब शोधून तो कोळीवाड्यात आणण्यात आला. या खांबाला रंगीबेरंगी रंग लावून विधीवत पूजा करण्यात आली. त्यानंतर मंत्रोच्चार आणि पारंपरिक रीतीरिवाजांनुसार होळी उभारण्यात आली.
कोळी समाजातील ज्येष्ठ मंडळींच्या उपस्थितीत होळीची मनोभावे पूजा अर्चना करण्यात आली. नैवेद्य दाखवून सर्वांनी एकत्र येत शिमगा उत्सव साजरा केला. पारंपरिक पोशाख, ढोल-ताशांचा निनाद आणि एकोप्याचे दर्शन यामुळे संपूर्ण परिसरात आनंदमय वातावरण निर्माण झाले होते.
विशेष म्हणजे, कोळीवाड्यातील प्रत्येक घरातील कुटुंब या उत्सवात सहभागी झाले होते. लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी या परंपरेत सहभाग नोंदवत सांस्कृतिक वारसा जपला.
धाराशिव जिल्ह्यातील राज्यातील सर्वात मोठा भुईकोट किल्ला अशी ख्याती असलेल्या आणि स्थापत्य शास्त्राचा अजोड नमुना समजल्या जाणाऱ्या धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग किल्ल्याच्या जतन व संवर्धनासाठी तब्बल १४ कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत.या किल्ल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि मूळ स्वरूपात दुरुस्ती करण्यासाठी सुमारे १० कोटी ८७ लाख रुपयांचा सविस्तर आराखडा तयार करण्यात आला आहे.तर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून चार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.अशी माहीती भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची दिली आहे.
शरद पवारांना उपचारानंतर घरी सोडलं जात आहे
चार दिवसाच्या विश्रांतीनंतर शरद पवार जाणार घरी
रविवारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने केलं होतं रुबी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट
सद्गुरू बाळूमामा मंदिर तीन ते सहा मार्चअखेर दर्शनासाठी पूर्णतः बंद
नऊ मार्चपासून सुरू होणाऱ्या वार्षिक भंडारा उत्सवाच्या तयारीसाठी मंदिर बंद
भाविकांनी या कालावधीत मंदिरात येण्याचे टाळावे
गेल्या आठ-दहा दिवसात कापसाचे दर हजार ते बाराशे रुपये कमी झाले आहे.कापसाचे दर वाढतील व शेतकऱ्यांना संपूर्ण कापूस निघायचा असल्याने शेतकऱ्यांनी कापूस घरात साठवून ठेवला,गेल्या आठ-दहा दिवसाच्या तुलनेत कापसाचे दर हजार ते बाराशे रुपये कमी झाले त्यामुळे शेतकरी कापसाचे दर वाढतील अशी आशा होती,अशातच शासनाच्या सीसीआयन कडून कापूस खरेदी संदर्भात नोंदणीची अंतिम तारीख 27 फेब्रुवारी ठेवल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी आता अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांकडे कागदपत्र तयार नसल्याने शेतकरी 27 फेब्रुवारी पूर्वी सीसीआय कडे नोंदणी करू शकणार नाही.त्यामुळे शेतकऱ्यांना खुल्या बाजारात कमी भावात कापसाची विक्री करावी लागणार आहे. व त्यातही आता जर सीसीआयने नोंदणी बंद केली तर शेतकऱ्यांनी कापूस विक्री कुठे करावी असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.देशात हिरवा पिवळा झेंडा धोक्यात नाही तर संपूर्ण शेतकरी धोक्यात असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी यावेळी शेतकऱ्यांनी दिली.....
अमरावतीचे माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांची भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रवीण पोटे यांच्या निवडीबाबत घोषणा केली.प्रदेश कार्यकारणीत पोटेना महत्त्वाची जबाबदारी मिळाल्याबद्दल अमरावती भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळतेय. भाजपला पश्चिम विदर्भात अधिक मजबूत करू,अशी प्रतिक्रिया प्रवीण पोटेंनी नियुक्ती झाल्यावर दिली आहे.
पंढरपुरातील एका हाॅटेला आज पहाटे अचानक आग लागली.
आगीत तथास्तु फॅमिली हाॅटेल जळून खाक झाले आहे. आगीत सुमारे 75 ते 80 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी असाही प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.
दरम्यान आग विझवण्यासाठी नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने प्रयत्न केल्याने मोठा अनर्थ टळला.
बीड येथील जीएसटी विभागातील अधिकारी सचिन जाधवर यांनी 17 जानेवारी रोजी आत्महत्या केली होती... त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी प्रदीप फाटे यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे नमूद केले होते या प्रकरणात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झालेला आहे... परंतु या घटनेला एक महिल उलटला तरी अद्यापही या आरोपीला अटक झालेली नाही... गंभीर बाब म्हणजे प्रदीप फाटे याचा जामीन न्यायालयाने फेटाळला तरीदेखील पोलीस कारवाई करत नसल्याने आता जाधवर यांच्या पत्नी मयुरी जाधवर या आपल्या लहान मुलांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहेत... गेले एक महिना मी न्यायाच्या प्रतीक्षेत आहे... आता तरी पोलिसांनी या आरोपीला अटक करावी... पालकमंत्री सुनेत्राताई पवार व गृहमंत्री यांनी मला न्याय द्यावा अशी आर्थ हाक मयुरी जाधवर यांनी दिली आहे..
तांत्रिक प्रक्रियेमुळे ब्रिटिश एअरवेजचे विमान नागपुरात 26 तास अडकले
लंडनहून हैदराबादला निघालेले ब्रिटिश एअरवेजचे विमान हैदराबाद मधील खराब हवामानामुळे मंगळवारी पहाटे नागपुरात उतरवावे लागले होते
टेक ऑफ पूर्वी नियमानुसार विमानाचे जीपीएस रिसेट करणे अनिवार्य असते, ते केल्यावर त्यावर मान्यता प्राप्त इंजिनिअरची स्वाक्षरी आवश्यक असते
मुंबईहून मान्यताप्राप्त इंजिनिअर येईपर्यंत विमानाला हिरवा कंदील मिळू शकला नाही
तसेच विमानातील कर्मचाऱ्यांच्या ड्युटीच्या वेळेची मर्यादा संपल्याने 'फ्लाईट ड्युटी टाईम लिमिटेशन' नुसार त्यांना विश्रांती देण्यात आली
सर्व तांत्रिक कारवाई पूर्ण झाल्यानंतर विमान आज सकाळी हैदराबाद साठी रवाना झाले
आज देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू या शेगावच्या दौऱ्यावर आहे . शेगाव येथील श्री संत गजानन महाराज समाधी च्या त्या दर्शन घेणार आहेत.. राष्ट्रपतींच्या हस्ते मंदिरात विशेष आरतीही करण्यात येणार आहे.. इतिहासात प्रथमच राष्ट्रपती शेगावात येणार असल्याने भाविकांसह परिसरातील नागरिकांमध्येही उत्साह आहे.. संत गजानन महाराज संस्थाने ही महामहीम राष्ट्रपतींचे स्वागत करण्यासाठी विशेष तयारी केली आहे.. महामहीम राष्ट्रपतींचे स्वागतासाठी संत गजानन महाराज संस्थाने विशेष करून "संस्कृत" मध्ये स्वागत फलक लावले आहेत . हे स्वागत फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत... राष्ट्रपतींसोबत राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही असणार आहेत.. राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी संपूर्ण शेगाव शहर हे सुरक्षा यंत्रणांनी आपल्या ताब्यात घेतला आहे.
बारावीच्या पेपर फूट प्रकरणात दोन संशयतांची पोलिसांकडून चौकशी
बारावीच्या पेपर फूट प्रकरणात नागपूर पोलिसांनी भंडारा येथून दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली
मात्र चौकशीनंतर या प्रकरणात सहभाग न आढळल्याने त्यांना सोडून देण्यात आले
आतापर्यंत या प्रकरणात चौघांना पोलिसांनी अटक केली आहे
एका कोचिंग क्लास मधून प्रश्नपत्रिका आली होती, त्यांच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण सुरू आहे
सखोल चौकशीतूनच प्रश्नपत्रिका नेमकी बाहेर कशी आली याचा उलगडा होऊ शकणार आहे
एमएमआरडीएने मेट्रो प्रकल्पांना दिलेल्या निधीवरून अंबरनाथमध्ये शिवसेना-भाजपात श्रेयवाद रंगल्याचं पाहायला मिळतंय. कारण दोन्ही पक्षांनी मेट्रोचे बॅनर्स लावले असून त्यात एकमेकांच्या नेत्यांचे आभार मानणं मात्र टाळलं आहे.
व्हीओ : अंबरनाथ नगरपालिकेसमोर कल्पना हॉटेलच्या मुख्य चौकात शिवसेना आणि भाजपाने मेट्रोला निधी दिल्याबद्दल आभार मानणारे बॅनर लावले आहेत. शिवसेनेच्या बॅनरवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानण्यात आले आहेत, तर भाजपच्या बॅनरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानण्यात आले आहेत. वास्तविक पाहता राज्यात युतीची सत्ता असताना संपूर्ण सरकारचे आभार मानणं अपेक्षित असताना दोन्ही पक्षांनी फक्त आपापल्याच नेत्यांचे आभार मानल्याने या दोन्ही पक्षांमध्ये मेट्रो प्रकल्पांवरून श्रेयवाद सुरू झाल्याची चर्चा अंबरनाथ शहरात यानिमित्ताने रंगली आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नागपुरात ब्रम्हाकुमारीजच्या राज्यव्यापी मोहिमेचा प्रारंभ
जामठा येथील विश्वशांती सरोवर येथे कार्यक्रम सायंकाळी होणार उद्घाटन सोहळा
विश्वास, सौहार्दता व मानवतेचा संदेश अभियानाचा उद्देश समाजमूल्यांची जपणूक
राज्यपाल आचार्य देवव्रत यांची उपस्थिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेही राहणार हजर
बी.के. मृत्युंजय भाई, बी.के. चंद्रिका उपस्थित नागपूरच्या बी.के. रजनी यांचीही उपस्थिती
दोन हजारांहून अधिक पोलीस तैनात दौऱ्यासाठी कडेकोट बंदोबस्त
वर्धा मार्गावर जड वाहतुकीस बंदी पर्यायी मार्गांवरून वाहतूक वळवली
मंत्री नरहरी झिरवळांच्या मतदार संघात एसीबीची मोठी कारवाई
रासेगावच्या सरपंच मंदा बेडकुळे आणि पती विठ्ठल बेडकुळे लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात
उपसरपंचावर आणलेला अविश्वास ठराव नामंजूर करण्यासाठी मागितली होती ५० हजारांची लाच
तडजोडीत २५ हजार मान्य करत १५ हजार स्वीकारताना सरपंच पत्नीसह पती अटकेत
नाशिकच्या एसीबीच्या पथकाने दिंडोरी तालुक्यात केलेल्या कारवाईने खळबळ
यवतमाळ जिल्हा परिषदेतील दिव्यांग शिक्षक, कर्मचाऱ्यांची प्रत्यक्ष पाहणी मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की उद्या करणार आहेत संपूर्ण दिव्यांग अधिकारी कर्मचाऱ्यांना निर्धारित वेळेत उपस्थित राहावे अशा स्पष्ट सूचना पत्राद्वारे देण्यात आल्या आहेत त्यामुळे बोगस दिव्यांग अधिकारी, शिक्षक- कर्मचाऱ्यांचे हृदयाचे चांगले ठोके वाढले आहेत.
यवतमाळ जिल्ह्यात अवकाळीचा नऊ हजार हेक्टरवरील पिकांना फटका
उमरखेड तालुक्यात सर्वाधिक नुकसान,29 घरांची पडझड
जिल्ह्यात 12 तालुक्यांना अवकाळी पावसाने झोडपले,आठ हजार 961 हेक्टरवरील गहू-हरभरा पिकाला बसला फटका
घाटंजी, राळेगांव तालुक्यात 29 घरांची पडझड,एकट्या उमरखेड तालुक्यात सात हजार 450 हेक्टरवरील पिकांचे नुकसान
अवकाळी पाऊस,वादळी वारा आणि गारपीटमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, पुढील दोन दिवस जिल्ह्यात काही भागात अवकाळी पावसाची शक्यता वरतीविण्यात आली आहे शेतकऱ्यांसह नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या कोर कमिटीचे महत्त्वाची बैठक पार पडली
भाजपाकडून चार उमेदवार देण्यात येणार.
भाजपकडून रामदास आठवले यांचे नाव जवळपास निश्चित
इतर तीन नावासंदर्भात कोर कमिटीच्या बैठकीत चर्चा पार पडणार
बैठकीसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुधीर मुनगंटीवार सह अनेक नेते दाखल.
नाशिक - ट्रकच्या धडकेत पादचारी ठार
नाशिकच्या येवला शहरातून जाणाऱ्या संभाजीनगर-नाशिक महामार्गावर रात्रीच्या सुमारास ऐका ट्रकने रस्त्याने जाणाऱ्या पादचाऱ्यांला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली
ट्रक कोटमगाव उड्डाण पुलावरून खाली आल्यानंतर खाऊ गल्ली जवळ ही घटना घडली,घटना घडताच परिसरातील नागरिकांनी धाव घेतली
मात्र गर्दीचा फायदा घेत ट्रक चालक फरार झाल्याने काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते
स्थानिकांनी रुग्णवाहिकेला बोलवत मृत व्यक्तीचा मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवला
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले
मृत व्यक्ती कोण आहे याचा येवला शहर पोलीस अधिक तपास करत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.