Dhule Tourism : महाराष्ट्रात इथे आहे 'ट्रँगल' आकाराचा किल्ला, तापी नदीचं विलोभनीय रूप पाहून हरवून जाल

Shreya Maskar

धुळे

महाराष्ट्रातील धुळे येथे तापी नदीच्या काठावर थाळनेर किल्ला वसलेला आहे. फारुकी राजवंशाची झलक दाखवणारा एक ऐतिहासिक त्रिकोणी किल्ला आहे.

Dhule | google

कोणी बांधला?

थाळनेर किल्ला मलिक खानने १३७० मध्ये बांधला आहे. थाळनेर किल्ला एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र आणि लष्करी ठाणे होते.

Fort | google

पहिली राजधानी

थाळनेर किल्ला हा खानदेशातील फारुकी घराण्याची पहिली राजधानी होती. जो पुढे मुघल, मराठा (होळकर) आणि शेवटी १८१८ मध्ये ब्रिटिशांच्या ताब्यात आला.

Fort | yandex

शिलालेख

थाळनेर किल्ल्यावर फारुकी राजवटीतील महत्त्वाच्या व्यक्तींच्या कबरी आहेत, ज्यावर अरबी भाषेतील शिलालेख कोरलेले आहेत.

Fort | google

खानदेश

थाळनेर किल्ला सध्या हा किल्ला पडझड झालेल्या अवस्थेत असला तरी, तो खानदेशाच्या इतिहासाचा एक महत्त्वाचा साक्षीदार आहे.

Fort | google

धुळे पर्यटन स्थळे

धुळे येथे लालिंग किल्ला, सोंगीर किल्ला, भामेर किल्ला, अकरायदेवी मंदिर यांचा समावेश आहे. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात येथे नक्की भेट द्या.

Fort | google

किल्ल्याचा पायथा

थाळनेर किल्ल्याच्या पायथ्याशी प्राचीन पाताळेश्वर मंदिर आहे. हे एक जुने दगडी मंदिर असून, या भागाला या मंदिरामुळेच 'थाळनेर' नाव पडले असावे, असे बोले जाते.

Fort | google

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत.

Trip | yandex

NEXT : होली खेले रघुवीरा...! एकदा तरी 'या' शहरांची होळी अनुभवलीच पाहिजे, मजा-मस्तीसोबत घ्या रंगांचा आनंद

Holi 2026 Travel | yandex
येथे क्लिक करा...