Shreya Maskar
मथुरा हे भगवान श्रीकृष्णाची जन्मभूमि आहे. येथे द्वारकाधीश मंदिरात होळीचा मोठा रंगोत्सव साजरा केला जातो. सांस्कृतिक कार्यक्रम पाहायला मिळतात.
वृंदावन येथे बांके बिहारी मंदिरात फुलांची होळी प्रसिद्ध आहे. ही होळी खेळण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक येतात.
बरसाना येथील लठमार होळी ही जगभरात प्रसिद्ध आहे. परंपरेनुसार महिलांनी खेळकरपणे पुरुषांना लाठ्यांनी मारतात. ही परंपरा राधा-कृष्णाच्या पौराणिक कथेवर आधारित आहे.
जयपूरमध्ये राजेशाही थाटात होळीचा सण साजरा केला जातो. पारंपरिक लोकनृत्य, सजावट आणि सांस्कृतिक मिरवणुका हे येथील आकर्षण आहे.
उदयपूरमधील राजवाड्यांमध्ये शाही होळी साजरी केली जाते. सिटी पॅलेसमध्ये भव्य, पारंपरिक होळी उत्सव आयोजित केला जातो. येथे होलिका दहन अत्यंत भव्य पद्धतीने केले जाते.
दिल्लीतही होळीचा मोठा उत्साह पाहायला मिळतो. येथे मोठ्या स्तरावर रंगोत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात. तरुणाईसाठी खास होळी पार्ट्यांचे आयोजन केले जाते.
हम्पी हे दक्षिण भारतातील प्रसिद्ध होळी ठिकाण आहे. पारंपरिक ढोल-ताशे, नृत्य आणि रंगांची उधळण यामुळे वातावरण रंगतदार होते. परदेशी पर्यटक येथे मोठ्या संख्येने येतात.
शांतिनिकेतन येथे होळी 'बसंत उत्सव' म्हणून साजरी केली जाते. रवींद्रनाथ टागोर यांनी ही परंपरा सुरू केली आहे. वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करून गाणे-नृत्य केले जाते. अबीर (रंग) लावून उत्सव साजरा केला जातो.